वीज कर्मचा-यांना मारहाण करणा-याविरोधात कठोर पोलीस कारवाईसाठी महावितरण आग्रही

नागपूर :- वीजबिल थकबाकी वसुलीसाठी जाणा-या महावितरणच्या कर्मचा-यांना मारहाण करण्याचे प्रकार जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असल्याच्या घटना गांभिर्याने घेत मारहाण करणा-यांविरोधात कठोर पोलीस कारवई करण्याबाबत आग्रही असल्याचे संकेत महावितरण प्रशासनाने दिले आहेत. मागिल तीन दिवसात नागपूर शहरातील मोमीनपुरा, खादीम मिर्झा गल्ली, खदान याशिवाय काटोल येथे देखील थकबाकी वसुल करणा-या महावितरण कर्मचा-यांना मारहाण झाली आहे. या सर्व घटना गांभिर्याने घेत महावितरण प्रशासन अश्या आरोपींविरोधात आक्रमक झाली आहे.

महावितरण ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असल्याने नफा कमावणे हा महावितरणचा उद्देश नाही. मात्र महावितरणचे अस्तित्व हे विकलेल्या प्रत्येक युनिट वीजेचे पैसे वसूल होण्यावर अवलंबून आहे. वीजबिलांच्या थकबाकीचे प्रमाण वाढल्याने महावितरणला आर्थिक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे, ही परिस्थिती लक्षात घेता ग्राहकांनी वीज देयकांचा नियमित भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरणचे कर्मचारी उन्ह, वारा, पावसात ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे काम करीत असतात. मात्र अनेकदा त्यांना ग्राहकांच्या रोषाला विनाकारण बळी पडावे लागते. परंतु ज्या शासकीय कर्मचा-यांचा थेट जनतेशी प्रत्यक्ष संबंध येतो व ज्यांना जनतेच्या रोषाला बळी पडावे लागते व प्रसंगी मारहाण होते अशांसाठी भारतिय न्याय संहिता कलम 132, 126(2), 296. 114(2), 352, 351(3). अन्वये आरोपीला कठोर शिक्षेची तरतूद आहे. या कलमाचा आधार घेत मागील काही दिवसांत झालेल्या हल्ल्यातील घटनांमध्ये महावितरणने हल्लेखोरांविरोधात कठोर भूमिका घेतल्याने बहुतांश आरोपींना अटक करण्यात आली असुन त्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी महावितरण प्रशासन पाठपुरावा करीत आहे.

वीज कर्मचा-यांना होणा-या मारहाणीच्या घटनांचे गांभिर्य लक्षात घेता महावितरण प्रशासनाने आरोपींना तात्काळ अटक व्हावी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी याकरिता प्रशासनाने संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा सुरू केला आहे. ‘वीज थकबाकी वसूल करायची नाही, विजेची चोरी पकडायची नाही, गळती थांबवायची नाही, शासकीय सेवा ह्या मोफ़त वापरायसाठीच असल्याच्या थाटात काही ग्राहक वागत असल्याने महावितरणपुढे ग्राहकांकडील थकबाकीचा डोंगर उभा राहिला आहे. थकबाकी वसुल केल्याशिवाय ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा करणे अशक्य असल्याने अशा पद्धतीने महावितरणचा कारभार कसा चालवायचा असा प्रश्न महावितरणपुढे निर्माण झाला आहे.

महावितरण कार्यालयांना घेराव घालणे, कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवणे, तोडफ़ोड-जाळपोळ करणे हे प्रकार होत असतील तर महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काम तरी कसे करायचे?’ असा प्रश्न कर्मचारी संघटना वारंवार उपस्थित करीत आहेत. ‘उद्दीष्टाप्रमाणे वीज थकबाकी वसूल न झाल्यास वीज पुरवठा करणे अशक्य होईल. तरी वीज ग्राहकांनी महावितरणची बाजूही समजून घेणे आवश्यक आहे. थकबाकीपोटी आपला वीज पुरवठा खंडित केल्यामुळे काही थकबाकीदारांनी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, कार्यालयाची तोडफोड करणे हे प्रकार अलीकडच्या काळात वाढले आहेत, संबंधितांविरुद्ध गुन्हेही दाखल झाले आहेत तर काही ठिकाणी आरोपींणा अटक देखील झाली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अमृत प्रतिष्ठान चा दोन दिवसीय दमदार रौप्यमहोत्सव साजरा

Sat Aug 31 , 2024
नागपूर :- संगीताचार्य गुरुवर्य कै.पं.अमृतराव निस्ताने यांना समर्पित अमृत प्रतिष्ठान नागपूर चा‌ दोन दिवसीय रौप्यमहोत्सवी “त्रिवेणी संगीत समारोह -२०२४” जन्माष्टमी च्या पावन पर्वावर आयोजित करण्यात आला. या समारोहाचे उद्घाटन महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री मा.मुनगंटीवार यांचे हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर स्वागताध्यक्ष आणि भाजप चे संघटन मंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, उद्योजक आशिष गर्ग, अमृत प्रतिष्ठान चे मोहन निस्ताने, मोरेश्वर निस्ताने उपस्थित होते. यावेळी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!