संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- नगरपरिषद कन्हान-पिपरी प्रभाग क्र. ७ येथे अनुसूचित जमाती सदस्य पदाच्या एका रिक्त जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीच्या मत मोजणीत महाविकास आघाडी व्दारे कॉग्रेस च्या राखी परते ८३४ मते घेऊन विजयी झाल्याचे निवडणुक अधिकारी वंदना संर्वगपते, नगरपरिषद मुख्या धिकारी रविंद्र श्रीराम राऊत हयानी घोषित करताच महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी जल्लोष साजरा केला.
नगरपरिषद कन्हान-पिपरी प्रभाग क्र. ७ येथे अनुसूचित जमाती सदस्य पदाच्या एका रिक्त जागेची पोटनिवडणुक रविवार (दि.११) ऑगस्ट २०२४ ला झालेल्या निवडणुकीत ५ बुथ वर एकुण ४६२९ मतदारा पैकी २१७४ मतदारानी मतदान केल्याने ४६.९६ टक्के मतदान झाले. या पोट निवडणुकीत निवडणुक अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अनेक मतदारांचे यादीतुन नाव गहाळ झाले असताना सुध्दा महाविकास आघाडी व्दारे ही निवडणुक येणा-या विधानसभा आणि ६ महिन्याने कन्हान नगरपरिषदेच्या निवडणुकीची तालीम म्हणुन निवडणुक लढवित कॉग्रेस पक्षाच्या राखी परते यांना पंजा चिन्हावर लढवुन राखी परते यांना ८३४ मतदान मिळाले. भाजप चे उमेदवार नंदकिशोर श्रीरामे यांना ८०६ मतदान तर शिवसेना शिंदे गटाचे उमेवार हिरालाल नारनवरे हयाना ५१३ मतदान आणि नोटा ला २१ मतदान झाल्या ने महाविकास आघाडीतील कॉग्रेस पक्षाच्या रा़खी परते यानी भाजपा-शिव सेना (शिंदे गट) महायुती मध्ये फुट पडल्याने भाजप पक्षाचे उम्मेदवार नंदकिशोर श्रीरामे पेक्षा २८ मते जास्त घेऊन विजयी झाल्या तर नगरपरिषद व राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हिरालाल नारनवरे हयाना तिस-या क्रमाकाची मते देऊन सत्ताधारी विरूध्द असलेला रौष मतदारानी व्यकत केला.
या निवडणुकीत ३० टक्के च्या वर स्थानिक मतदार, मतदाना पासुन वंचित केल्यावर सुध्दा शिवसेना (उबाठा) गटाचे माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या नेतुत्वात महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा) गटाचे तालुका प्रमुख कैलास खंडार, समीर मेश्राम, माजी जि प सदस्य अंबादास खंडारे कॉग्रेसचे खासदार श्यामकुमार बर्वे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, उपाध्यक्ष नरेश बर्वे, युवक कॉग्रेसचे आकिब सिद्दीकी, न प उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी, गटनेते मनिष भिवगडे, नगरसेविका रेखा टोहणे, गुंफा तिडके, राकॉ (शरद पवार गट) जिल्हा कार्याध्यक्ष किशोर बेलसरे, अशोक पाटील, बीआरएसपी राज्य उपाध्यक्ष शांताराम जळते, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे सुखलाल मडावी, पंचम सलामे, प्रहारचे नगरसेवक विनय यादव,
आप चे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर दारोडे सह महाविकास आघाडी च्या पक्षाचे दिलीप राईकवार, गणेश भोंगाडे, प्रदीप वानखेडे, प्रभाकर बावने, सचिन साळवी, बंटी हेटे, जिवन ठवकर, हबीब शेख, प्रदीप बावने, राजेश गणोरकर, रिता बर्वे, वैशाली खंडार, सुनिता मानकर, बाळा मेश्राम, अकरम कुरेशी सह पदाधिकारी, कार्यकर्त्याच्या सहकार्याने विजयश्री संपादन करण्यात आल्याने हर्षोउल्हास साजरा करण्यात येत असुन कॉग्रेसच्या विजयी उमेदवार राखी परते हयानी सर्व मतदार आणि सहकार्य करणा-या पदाधिकारी व कार्यकर्त्याचे आ़भार व्यकत केेले आहे.