महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019- अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना शेतकरी आधार प्रमाणिकरण करणेबाबत जाहिर आवाहन

गडचिरोली :- महाराष्ट्र शासनाने महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना – 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेबाबत दि.29 जुलै 2022 रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. सन 2017-18, सन 2018-19 व सन 2019-20 या आर्थिक वर्षात घेतलेल्या कर्जापैकी दोन वर्षाच्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेत जास्तीत जास्त़ रु.50 हजार रुपयेपर्यंत पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. या तीन वर्षापैकी शेवटच्या वर्षात जे कर्ज घेतलेले आहे. त्या वर्षाच्या कर्जाची मुददल रक्क़म विचारात घेतली जाणार आहे.

या योजनेअंतर्गत जिल्हयातील जिल्हा मध्य़वर्ती सहकारी बँक, सर्व राष्ट्रीयकृत व खाजगी बँका यांनी या योजनेत पात्र असलेल्या खातेदारांची माहिती ऑनलाईन पोर्टलवर भरलेली आहे. त्या अंतर्गत विशिष्ट़ क्रमांकासहची यादी संबंधीत बँका, जिल्हा उपनिबंधक, व तालुका सहाय्य़क निबंधक कार्यालयात तसेच गावचावडी, ग्रामपंचायत, विकास संस्था येथे प्रसिध्द़ करण्यात आलेली आहे. विशिष्ट़़ क्रमांकासह यादी प्रसिध्द़ झाल्यानंतर त्यातील शेतकऱ्यांनी संबंधीत बँकेत किंवा सेवा केंद्रामध्ये जाऊन आधार प्रमाणिकरण करावयाचे आहे.

आधार प्रमाणिकरणानंतर पात्र लाभार्थ्यांची प्रोत्साहनपर लाभाची रक्क़म त्यांच्या बँकेच्या सेव्हिंग खात्यावर जमा होणार आहे. आधार प्रमाणिकरणासाठी गेल्यानंतर त्यांचा आधार क्रमांक किंवा त्यांच्या कर्जाची रक्क़म चुकली असेल, तर त्याबाबत त्या शेतकऱ्याने तशी तक्रार संबंधित पोर्टलवर नोंदवावयाची आहे, अशा प्राप्त़ होणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या तर तालुकास्त़रावर संबंधित तालुक्याचे तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

तरी गडचिरोली जिल्हयातील तालुका निहाय सिरोंचा- 26, मुलचेरा-32, कुरखेडा-14, कोरची-2, गडचिरेाली-29, एटापल्ली-13, धानोरा-7, देसाईगंज-10, चामोर्शी-72, भामरागड-9, आरमोरी-9, आरमोरी-39 व अहेरी-30 असे मिळुन एकुण 282 आधार प्रमाणिकरण करणे शिल्ल़क असुन, या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणिकरण करुन घेणे आवश्य़क असल्याने तालुक्यातील आपले सरकार/सी.एस.सी सेंटर/संग्राम केंद्रावर जाऊन आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे. असे जाहीर आवाहन सहकार आयुक्त़ व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य़, पुणे व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जि.गडचिरोली यांनी केलेले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विभागीय आयुक्त पी.वेलरासू यांच्या हस्ते कोंकण भवन येथे ध्वजारोहण संपन्न

Fri Aug 16 , 2024
नवी मुंबई :- भारतीय स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन आज कोंकण भवन येथे जल्लोषात साजरा झाला. यावेळी कोंकण विभागीय महसूल आयुक्त पी.वेलरासू यांच्या हस्ते कोंकण भवन प्रांगणात सकाळी 09.05 वाजता ध्वजारोहण संपन्न झाले. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार मंदाताई म्हात्रे, अपर आयुक्त कोकण विभाग विकास पानसरे, उपायुक्त (महसूल) विवेक गायकवाड, उपायुक्त (सामान्य प्रशासन) संजीव पालांडे, उपायुक्त (पुनर्वसन) अमोल यादव, उपायुक्त […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!