संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- सिंधू एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालीत महात्मा गांधी सेंटर हायस्कूल जरीपटका नागपूर येथे 1 मे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष व ओंकार सिंधू हायस्कूलच्या प्राचार्या विना बजाज यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सिंधू एज्युकेशन सोसायटीचे डायरेक्टर व महात्मा गांधी हायस्कूलचे प्राचार्य बजाज डिंपी बजाज,उपप्राचार्य सुदाम राखडे, खूपचंद बजाज सेंटर पब्लिक स्कूलच्या प्राचार्य सोनिया वालीया, महात्मा गांधी सेन्टेनर सिंधू इंग्लिश प्राइमरी हायस्कूल जुनियर कॉलेजच्या प्राचार्य डायना अब्राहम ,पर्यवेक्षक अनिल कोगे , अर्चना हिवसे, आरती रतवाणी, मधु बजाज, सुमन उदासी, कांचन जग्याशी उपस्थित होते कार्यक्रमात सेंट्रल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गीत सादर केले योगेश किटकारू , यांनी एक सुंदर महाराष्ट्र गीत सादर केलेे. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सिंधू एज्युकेशन सोसायटीच्या डायरेक्टर डीपी बजाज म्हणाल्या महाराष्ट्र हा थोर पुरुष संतांची भूमी असून विविध जाती धर्माचे नागरिक मोठ्या प्रमाणात गुण्या गोविंदाने नांदून राष्ट्रीय एकात्मता निर्माण करीत आहेत त्यामुळे महाराष्ट्र राज्य हा प्रगतीच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाटचाल करीत आहे आजच्या या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी थोर पुरुष संतांचा आदर्श ठेवून विविध स्पर्धेत सहभागी होऊन आपला व शाळेचा नाव गौरवित करून करण्याचे आव्हान केले कार्यक्रमाचे संचालन सचिन धनवंत यांनी केले व आभार प्रदर्शन उपप्राचार्य सुदाम राखडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नंदलाल संतवाणी, कमलेश नायडू, विलास जोंधळे ,क्लिफोर्ड नायडू ,विक्रांत धाये ,विजय पटले, विकी वर्मा , देवेश शिवहरे ,जगदीश मुळे ,सचिन सोमवार, प्रदीप डोंहरे, यांनी परिश्रम घेतले.