बुलढाणा – जिल्हाधिकारी तूम्मोड यांची मनसेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन किमान वेतन आणि कामगार सुविधा मिळण्याबाबत कामगार अधिकारी यांच्याकडून होत असलेल्या दिरंगाईबाबत विषय मांडले.
खामगाव नागरपरिषदेसाठी कचरा वाहतूक करण्याऱ्या कंत्राटी कामगारांना किमान वेतन लवकरात लवकर लागू नाही केले गेले तर आंदोलन तीव्र होईल असे मनसे कामगार सेनेचे उपाध्यक्ष केतन नाईक यांनी यावेळी सांगितले.एकीकडे मुख्यमंत्री सफाई कामगारांसाठी मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयांचा पाढा वाचत आहेत आणि दुसरीकडे कंत्राटी तत्वावर सामान पद्धतीचे काम करणाऱ्या कामगाराला किमान वेतनासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे असे प्रतिपादन केतन नाईक यांनी केले.
शिवांगी बेकर्स या ParleG साठी कार्यरत आस्थापनेच्या मालकांवर शासनाकडून दाखल करण्यात आलेल्या फौजदारी गुन्ह्याला अनुसरून त्वरित कारवाही व्हावी अशी मागणी मनसेच्या शिष्ठमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
जिल्हाधिकारी तुम्मोड यांनी सरकारी कामगार अधिकारी राठोड यांना सदर विषयात कारवाही करून अहवाल प्रस्तुत करण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रसंगी मनकासे चिटणीस निलेश पाटील, उपचिटणीस अक्षय परवडी, मनसेचे जिल्हाध्यक्ष मदन राजे गायकवाड, जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, तालुकाध्यक्ष बुलढाणा अमोल रिंढे पाटील, चिखली तालुका अध्यक्ष विनोद खरपास, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कापसे, शेतकरी सेल जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर, जिल्हा उपाध्यक्ष राजेश परियार,शहराध्यक्ष नारायण बापू देशमुख, विद्यार्थी तालुकाध्यक्ष स्वप्निल असोले, तालुका उपाध्यक्ष संदीप नरवाडे,शहराध्यक्ष मनोज पवार, उपशहर अध्यक्ष शनी सवदे, अनिल वाघमारे, आशिष गायके, शाखाध्यक्ष गणेश इंगळे, दत्ता झुंबड, कडुबा शिरसाट, सोनू चिंचोले, अर्जुन वाणी, हरी पवार, अमोल गोरे, शेकडो कामगार आणि मनसेचे कार्यकर्ते जमा झाले होते.