पोलीस भवन, पोलीस आयुक्तालय नागपुर शहर येथे महाराष्ट्र दिन कार्यक्रम संपन्न

नागपूर :- दिनांक ०१.०५.२०२४ रोजी सकाळी ०७.३० वा. सुमारास, महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस आयुक्तालय, पोलीस भवनाचे प्रांगणात डॉ. रविन्द्रकुमार सिंगल पोलीस आयुक्त नागपुर शहर यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. बहुसंख्येने उपस्थित पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच आयुक्तालयातील कर्मचारी वृंद यांचे उपस्थितीत नमुद सोहळा पार पडला. पोलीस आयुक्त यांनी उपस्थित सर्वांना महाराष्ट्र दिनानिमीत्त शुभेच्छा देवुन अभिनंदन केले.

याप्रसंगी विशेष व गुणवत्तापुर्ण सेवेकरीता मा. पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह प्राप्त पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक विनोद मणिकराव चौधरी (वाहतूक), पोलीस निरीक्षक अजय श्रावण आकरे (कपिलनगर), सपोनि, ज्ञानेश्वर उराडे (विषेश शाखा), पोउपनि, अनिल ब्राम्हणकर(प्रतापनगर), सफी. संजय गुप्ता (विषेश शाखा), दशरथ मिश्रा (गुन्हेशाखा), पोहवा. राजेन्द्र तिवारी (मोटरपरीवहन), अनिल तुमसरे(पारडी), मनिष भोसले (मुख्यालय), विजय मानापूरे (विषेश शाखा), विशाल सांगोळे (पाचपावली), लक्ष्मण शेंडे (तहसिल), सुनिल जाधव (लकडगंज), प्रकाश गुजर (मुख्यालय), अजय यादव (हुडकेश्वर), दिनकर चांभारे (मुख्यालय), सचिन चौधरी (सक्करदरा), प्रविण गाणार (हुडकेश्वर), रविन्द्र राउत (ईमामवाडा), पोअं, वाहीद सैय्यद (वाहतुक शाखा), यांना मा. पोलीस आयुक्त यांचे हस्ते संन्मान चिन्ह प्रदान करून त्यांना पुष्पगुच्छ देवुन गौरवान्वित करण्यात आले.

कार्यक्रमात प्रामुख्याने सह. पोलीस आयुक्त अश्वती दोरजे, अपर पोलीस आयुक्त संजय पाटील, प्रमोद शेवाळे, शिवाजी राठोड, पोलीस उपायुक्त निमीत गोयल, अर्जीत चांडक, अश्वीनी पाटील, शशिकांत सातव, अनुराग जैन, राहुल मदने, गोरख भामरे, विजयकांत सागर, निकेतन कदम, सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त, वरीष्ठ पोलीस निरीक्षक व मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी, अंमलदार हजर होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर शहर पोलीसांची दारूबंदी, जुगार, इंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

Wed May 1 , 2024
नागपूर :- दिनांक ३०.०४.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये २९ केसेस, तसेच एन.डी.पी.एस कायद्यान्वये ०५ केसेस असे एकुण १४ केसेस मध्ये एकुण १६ ईसमावर कारवाई करून रू. २,४२.३६६/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच, वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ४,४९३ वाहन बालकांवर कारवाई करून एकूण रू. २,६१,३५०/- तडजोड शुल्क वसूल केले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com