महाराष्ट्र व कामगार दिवस भव्य मोफत आरोग्य तपासणी व आरोग्य कार्ड शिबीर संपन्न

 – ११० आरोग्य तपासणी व १६० आरोग्य कार्ड असे एकुण २७० नागरिकांना शिबीराचा लाभ.  

कन्हान : – एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिवसाचे औचित्य साधुन कन्हान शहर विकास मंच व्दारे आरोग्य तपासणी व आरोग्य कार्ड शिबीराचे आयोजन करू न २७० नागरिकानी लाभ देत महाराष्ट्र दिन व कामगार दिवस थाटात साजरा करण्यात आला.

             शहर विकास मंच द्वारे १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिवसी भव्य मोफत आरोग्य तपासणी आणि आरोग्य (हेल्थ) कार्ड शिबीर नगरपरिषद कन्हान-पिप रीच्या नवीन ईमारत येथे घेण्यात आला. अरिहंत हाॅस्पिटल, सुपरस्पेलिटी सेंटर नागपुर चे डॉ. रजन जैन, नगराध्यक्षा करुणा आष्टणकर, कन्हान पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर, कन्हान ग्रामिण पत्रकार संघाचे अध्यक्ष मोतीराम रहाटे आदी मान्य वरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करित पुजन व दीप प्रज्वलित करुन शिबीरांची सुरूवात करण्यात आली. शिबीरात अरिहंत हाॅस्पिटल, सुपर स्पेसिलिटी सेंटर नागपुर चे डॉ. रजन जैन, डॉ. नईम शेख, नर्स संध्या करंडे सह चमुंच्या सहकार्याने एकुण ११० नागरिकांची बीपी, शुगर, ईसीजी, दमा, अस्थमा आदी विविध आजारांची तपासणी करून सेवा प्रदान करण्यात आली. जीवनदायी विकास फाऊंडेशनचे अमित लाडेकर, प्रतिक सहारे, सपना चंदनखेडे, प्रणाली सातारकर सह चमुंच्या सहकार्याने १६० नागरिकांचे आरोग्य (हेल्थ) कार्ड बनविण्यात आले. कामगार दिवसा निमित्य नगरपरिषद स्वच्छता कामगारांचा अरिहंत हाॅस्पिटल सुपर स्पेसिलिटी सेंटर नागपुर चे डॉक्टर व जीवनदायी विकास फाऊंडेशनचे सहकारी मान्यवरांचा हस्ते वृक्ष, पेन आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वरिष्ट पत्रकार कमलसिंह यादव, कन्हान ग्रामिण पत्रकार संघ सचिव सुनिल सरोदे, येसंबा ग्रा पं उपसरपंच धनराज हारोडे, सहादेव मेंघर, वामन देशमुख, चंद्रशेखर बावनकुळे, राजेश पोटभरे, रतिराम सहारे, नेवालाल पात्रे, रविंद्र दुपारे, पंकज रामटेक, संजय चहांदे, प्रदीप बावने, सुनिल भोगे, संदीप परते, शंकर इवनाते, हरिष तिडके, चिंटु वाकुडकर, सुरज वरखडे, पंचम सलामे, प्रशांत मसार आदी प्रतिष्ठीत नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी अल्पोहार वितरित करुन कार्यक्रमाची सांगता करुन आरोग्य तपासणी व आरोग्य कार्ड शिबीराने महाराष्ट्र व कामगार दिवस थाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर, कार्याध्यक्ष योगराज आकरे, उपाध्यक्ष भुष ण खंते, सचिव हरीओम प्रकाश नारायण, सहसचिव अरविंद कटाले, कोषाध्यक्ष प्रकाश कुर्वे, मार्गदर्शक भरत सावळे, प्रभाकर रुंघे, ताराचंद निंबाळकर, शाह रुख खान, अनुराग महल्ले, रवि महाकाळकर, पुरुषो त्तम ऊके, विलास दुधबावने, विनोद खडसे, प्रशांत केवट आदीने सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिलाधिकारी,तहसील कार्यालय के अनुसूचित जनजाति वर्ग के पीड़ित अधिसंख्य कर्मचारियों का सरकार से सवाल ?

Tue May 2 , 2023
नागपुर :- राज्य सरकार द्वारा दिनांक 28.4.2023 को एक जीआर पास करके अनुसूचित जनजाति के जिला परिषद के सभी अधिसंख्य कर्मचारियों की सेवाओं को पूर्ववत बहाल किया गया तो जिलाधिकारी कार्यालय के भी सभी अनुसूचित जनजाति के अधिसंख्य कर्मचारियों को सरकार ने राहत प्रदान क्यों नहीं की हैं ? सरकार का एक ही मामले में दोहरा रवैया,भेदभाव क्यों ? सूत्रों […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com