नागपूर : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनाच्या औचित्याने रविवारी (१ मे) नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील हिरवळीवर मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
प्रारंभी मनपा आयुक्त यांच्या ‘तपस्या’ या शासकीय निवासस्थानावर आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी ध्वजारोहण केले. यानंतर मनपाच्या राजशिष्टाचारानुसार त्यांना अग्निशमन विभागाच्या पथकाद्वारे मनपा मुख्यालयात आणण्यात आले. मनपा मुख्यालयात ध्वजारोहणानंतर अग्निशमन विभागाच्या पथकाची मानवंदना मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी स्वीकारली.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त मिलींद मेश्राम, उपायुक्त घनकचरा व्यवस्था प्रकाश वराडे, सहायक आयुक्त अशोक पाटील, सहायक आयुक्त किरण बगडे, सहायक आयुक्त घनश्याम पंधरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, कार्यकारी अभियंता अविनाश बारहाते, कार्यकारी अभियंता अजय मानकर, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, उपमुख्य अग्निशमन अधिकारी भिमराव चंदनखेडे, समाजविकास अधिकारी दीनकर उमरेडकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
सुरूवातीला मनपा आयुक्त व प्रशासकांसह मान्यवरांनी अग्निशमन विभागाच्या परेडचे निरीक्षण केले. अग्निशमन विभागाच्या दोन प्लाटूनने यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्यासह अतिरिक्त आयुक्त दीपककु अनिल गोळे यांनी केले तर दुसऱ्या प्लाटूनचे नेतृत्व बी.बी. वाघ यांनी केले.
शिक्षण विभागाचे कलसिया आणि त्यांच्या चमूने राष्ट्रगीत सादर केले. कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केले व शेवटी त्यांनी आभारही मानले.