अरोली :- मागच्या वर्षी प्रमाणे यंदाही येथील सार्वजनिक हनुमान मंदिरात अयोध्येतील श्रीराम मंदिर वर्धापन दिनानिमित्त महाप्रसादाचे आयोजन उद्या 22 जानेवारी बुधवारला करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने आज 21 जानेवारी मंगळवारला मंदिर परिसरात आयोजक मंडळींनी सजावटीला सुरुवात केली असून यशस्वीतेसाठी परिश्रम घेताना दिसले.
सदर कार्यक्रमाला गावातील, परिसरातील सामाजिक व राजकीय पदाधिकारी, मान्यवर उपस्थित राहणार असून , गावातील व परिसरातील समस्त ग्रामस्थांनी याच्या लाभ घेण्याचे आव्हान गट ग्रामपंचायत पिपरी (खंडाळा) चे सरपंच सुरेश, चरडे, यांनी केले आहे.