नागपूर : राठौर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने महाकाल पालखी यात्रा महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून महाकाल पालखी भव्य पदयात्रेला मंगळवारी 21 तारखेला प्रारंभ सायंकाळी ५.०० वा. मौर्य समाज सभागृह साकेतनगर दाढीवाल ले आऊट येथून महाकाल पालखी पदयात्रेला सुरुवात होईल. हि पदयात्रा सर्वप्रथम साकेत नगर, रामेश्वारी चौक, नरेंद्र नगर, छत्रपती चौक, देवनगर, तात्या टोपे नगर, लक्ष्मी नगर, बजाज नगर, शंकर नगर, धरमपेठ, रामनगर, रवी नगर, त्यानंतर तेलंगखेडी मंदिर येथे ही पदयात्रा समाप्त होईल. आयोजक गजेंद्रसिंह राठोड उर्फ गोलू आणि नितीन कृष्णकुमार मिश्रा यांनी या महाकाल पालखी पदयात्रेचे आयोजन सायंकाळी ५ वाजता केले आहे. या पदयात्रेमध्ये जास्तीत जास्त मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी तसेच वस्तीतील नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा. असे म्हटले आहे.
रामेश्वरी ते तेलंगखेडी मंदीरापर्यत महाकाल पालखी पदयात्रा मंगळवारी.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com