नागपूर :-महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर मार्फत ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देण्याचे मोलाचे कार्य होत आहे. त्यामुळेच आज राज्यातील हजारो विद्यार्थी हे प्रगती पथावर गेले आहे. परंतु, विद्यावेतनात युनिव्हर्सिटी ग्रॅन्ट कमिशन (युजीसी) मार्फत नवीन सुधारित दर करण्यात आलेले होते, त्याच आधारावर महाज्योतीच्या संचालक मंडळाने आज पीएचडी संशोधकांच्या अर्थसहाय्य योजनेत वाढ केलेली आहे. आता महाज्योती नवीन दराने पीएचडी संशोधकांना अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (जेआरएफ) मध्ये आता 37 हजार रूपये व सीनियर रिसर्च फ़ेलोशिप (एसआरएफ) करिता 42 हजार रूपये प्रतिमाह दराने अधिछात्रवृत्तीची रक्कम तसेच घरभाडे भत्ता 30 टक्के, 20 टक्के व 10 टक्के या सुधारित दराने देण्यात येणार आहे. असल्याची माहिती महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
खवले यांनी सांगितले की, दर्जेदार प्रशिक्षण मिळावे तसेच विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देण्याचा हेतूने संस्था काम करत आहे. पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना दरमाह फेलोशिप देण्यात येत आहे, यातून शेकडो विद्यार्थ्यांना यश प्राप्त करता आले. आता यामध्ये 2 वर्ष जेआरएफ करिता 31 हजार रूपये प्रतीमाह देण्यात येत होते. तर एसआरएफ करिता उर्वरित 3 वर्षांसाठी 35 हजार प्रतिमाह अर्थसहाय्य देण्यात येत होते. तसेच घरभाडे भत्ता हा 24 टक्के, 18 टक्के व 8 टक्के या दराने देण्यात येत होता. मात्र, युजीसी मार्फत नवीन सुधारित दर करण्यात आलेले होते, त्याच आधारावर महाज्योतीने आज पीएचडी अर्थसहाय्य योजनेत वाढ केलेली आहे संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबत महाज्योतीने आज सुधारित दराने अर्थसहाय्य देण्यात मान्यता प्रदान केलेली आहे. जेआरएफकरिता आता 37 हजार रूपये व एसआरएफ करिता 42 हजार रूपये प्रतिमाह दराने अधिछात्रवृत्तीची रक्कम तसेच घरभाडे भत्ता 30 टक्के, 20 टक्के व 10 टक्के या सुधारित दराने देण्यात येणार आहे. 1 जानेवारी 2023 पासून लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता फरकाची रक्कम देखील पुढील हप्त्याच्या वेळी अदा करण्यात येणार आहे, असल्याची माहिती महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी दिली.