मुंबई – खोटं बोलण्यात भाजपची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होऊ शकते असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.
इतर लोकं खोटं बोलतात हे भाजपने बोलणं हास्यास्पद असून खोटं बोला पण रेटून बोला हा भाजपच्या लोकांचा उद्योगच आहे असा थेट आरोपही नवाब मलिक यांनी केला.
जे स्वतः खोटं बोलण्याचा उद्योग करतात त्यांना दुसर्यांकडे बोट दाखवण्याचा अधिकार नाही अशा शब्दात नवाब मलिक यांनी भाजपला सुनावले आहे.