– संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 25:-शिवसेनेतील बंडखोरीमुळे खूप मोठी राजकीय व संघटनात्मक उलथापालथ झाली आहे.मूळ शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी बैठकांचा धडाका लागत आहे.नुकतेच या क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने हे शिंदे गटात सहभागी झाल्याने मूळ शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांत नाराजगीचा सूर वाहत असून लवकरच तुमानेचा मोहिते करू असा नारा देण्यात आला.यातच कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागातील शिवसैनिकानी आम्ही उध्दवसाहेबांसोबत असल्याचे समार्थन केले, फक्त आमच्यावर भरोसा ठेवा, आपण सर्व शिवसेनेच्या पाठीशी आहोत अशी कट्टर विचारसरणी येथील शिवसैनिकात अजूनही कायम आहे.परिणामी कामठी तालुक्यातील शिवसैनिकाची पक्षाप्रति निष्ठा अजूनही कायम असल्याचे दिसून येते.