कामठी तालुक्यातील आडका गावातील अवैध माती उत्खननामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 11- कामठी तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मोठ्या प्रमाणात माती उत्खनन सुरू असून या अवैध माती उत्खननातून प्रशासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडाला असून अवैध माती उत्खनन मुळे दिघोरी गावातील एका 12 वर्षीय मुलाचा डबक्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता तर नागपूर नागभीड रेल्वे ब्रॉडगेज कामासाठी आडका गावात झालेल्या अवैध माती उत्खननांमुळे पडलेल्या खड्ड्यामुळे पावसाचे पाणी जमा झाले असून खड्डयांनी तलावाचे स्वरूप घेतले आहे तसेच अवैध माती उत्खनन झालेल्या या खड्डयालगत पुरुषोत्तम लक्ष्मण खोडके यासह आदी शेतकऱ्यांची शेती आहे .या शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तेव्हा या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी आडका गावातील शेतकरी बंधूनी केली आहे.
कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या महालगाव ग्रा प जवळील दिघोरी, आडका, गारला गावाला लागून मागील दीड वर्षांपासून रेल्वे प्रशासनाच्या वतीने नागपूर नागभीड रेल्वे ब्रॉडगेज चे रेल्वे लाईन व उडानपुल बांधकामाचे काम प्रगती पथावर असून या बांधकामाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या शेताच्या बाजूने अवैध व्यवसायिकांनी माती उत्खनन करण्याची कुठलीही रॉयल्टी न घेता विना परवाना बिनधास्तपणे जेसीबी,पोकलँड चा वापर करून 15ते 20 फूट खोल खड्डे करीत माती उत्खनन करून माती विकल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला असून येथील महसूल प्रशासनाच्या अभयपणामुळे या अवैध व्यवसायिकांनी हजारो पेक्षा अधिक ट्रक माती अवैध उत्खनन करून चोरी केली तर या चोरी प्रकरणातून या अवैध उत्खनन व्यवसायिकांनी अजूनपावेतो जवळ्पास कोटी रुपयांची महसूल चोरी केली आहे.उत्खनन झालेल्या या ठिकाणी नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले असून पाणी वाहत आहे.

 

मागिल जुलै महिन्यात 12 वर्षीय संजय चौधरी नामक मुलाचा या प्रकारच्या डबक्यात पडून मृत्यू झाल्याची घटना हृदयाला हेलावणारी आहे तरीसुद्धा या प्रकारच्या अवैध उत्खनन प्रकाराला आळा बसू शकला नाही हे एक दुर्दैवच मानावे लागेल तर तोच अवैध माती उत्खनन चा प्रकार अजूनही कायम असल्याने आडका गावातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे तेव्हा दाद मागायची कुणाला?अशी विचारणा येथील जागरूक नागरिक करीत आहे.

-तहसीलदार अक्षय पोयाम

आडका गावातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची माहिती कळताच वस्तुस्थिती बघुन घटनास्थळाचा पंचनामा करून नुकसांनग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी तहसील च्या संबंधित अधिकाऱ्यांना आडका गावात पाठविण्यात आले आहे.अहवालानुसार नुकसानभरपाई देण्यात येईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

गणेश मूर्तींची उंची संदर्भात भारतीय जनता युवा मोर्चाने दिले मनपाला निवेदन!

Mon Jul 11 , 2022
नागपूर –  गणपती हे महाराष्ट्राचे नव्हे तर संपुर्ण देशाचे आराध्य दैवत आहे. यंदा २०२२ चा गणेश उत्सव हा ३१/०८/२०२२ ते ०९/०९/२०२२ दरम्यान रहाणार आहे. अश्या वेळी मागील दोन वर्षांपासुन कोविडमुळे आपण साजरा करू शकलो नसल्यामुळे सर्वांच्या मनात उत्साह आणि आनंद असतांना प्रशासनाने गणपतीची मुर्ती ही केवळ ४ फुटाची असावी असा नुकताच आदेश काढला आहे. यामुळे दोन समुहांमध्ये परिणाम पडला आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com