संदीप कांबळे,कामठी
– ६ लाख ९७ हजार रूपयाची लोंखंडी पाईप लाईन चोरी
– कन्हान पोस्टे ला अति.अभियंता च्या तक्रारी ने अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल.
-स्था.गुअशा नागपुर (ग्रा) पथकाने पाच आरो पीना पकडुन ७ ते ८ आरोपीचा शोध घेत आहे.
कामठी : – औष्णिक विधुत केंद्र खापरखेडा येथील ५०० मेगाहँट प्लॉट ची जळालेली राख पाईप लाईनने नादंगाव राखबंधारा येथे विसर्जित केली जाते. काम बंद असुन देखरेख नसल्याने कुणीतरी अज्ञात चोरानी १००० मीटर लोखंडी पाईप लाईन किंमत ५६ लाख ९७ हजार रूपयाची कापुन चोरून नेल्याने खापरखेडा अतिरिक्त अभियंता योगेश मोहसिल च्या तक्रारीवरून कन्हान पोस्टे ला अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस व स्था.गु अ शा नागपुर (ग्रा) पथकाने समांतर करून पाच आरोपीना पकडुन ७ ते ८ आरोपीचा शोध घेत आहे.
महाजनको औष्णिक विधुत केंद्र खापरखेडा ५०० मेगाहँट प्लॉंटची जळालेली राख विसर्जित करण्याकरि ता नांदगाव शिवारात २५८ हेक्टर मध्ये राखबंधारा बांधुन नोव्हेबर २०२१ पासुन खापरखेडा ते नांदगाव १४ कि मी अंतरावर लांब दोन ३५० एम एम व्यासाची पाईपलाईन, एक २५० एम एम व्यासाची पाईपलाईन, तीन २०० एम एम व्यासाची अश्या ६ पाईपलाईन ने नांदगाव बंधा-यात कोळश्याची जळालेली राख विस र्जित करण्यात येत होती. या राखेमुळे नांदगाव परिस रात प्रदुर्षण तसेच बंधा-या लगतच असलेल्या पेंच नदी त राख मिश्रीत पाणी सोडुन होत असलेल्या प्रदुर्षणाने नागरिकांच्या जिवितास होणारा धोका लक्षात घेता राज्याचे पर्यावरण मंत्री मा. आदित्य ठाकरे यानी ग्राम स्थाच्या विनंती वरून १४ फेब्रुवारी ला प्रत्यक्ष नांदगाव राख बंधारा ला भेट देऊन प्रदुर्षणाचे गांभिर्य लक्षात घेत राख बंधारा बंद करण्याचे आदेश दिल्याने राख विसर्जनाचे काम बंद करण्यात आले.
नांदगाव येथील राख बंधा-यात राख टाकण्याचे काम नोव्हेबर २०२१ पासुन ते ४ फेब्रुवारी पर्यंत काम सुरू होते. तोपर्यंत तिथे महाजनको चे कर्मचारी यांची देखरेख होती. ४ फेब्रुवारी पासुन काम बंद असल्याने तेथे कर्मचारी देखरेख करण्यास जात नव्हते. (दि.६) एप्रिल २०२२ ला सकाळी ११ वाजता नांदगाव च्या
नागरिकांनी फोन व्दारे औष्णिक विधुत केंद्र खापरखे डा च्या ५०० मेगाहँट प्लॉट राख हाताळणी अतिरिक्त अभियंतास माहीती दिली की आपली टाकलेली लोखं डी पाईप लाईन कुणीतरी कापुन चोरी करित आहे. यावरून घटनास्थळी जाऊन पाहणी केली तर १००० मीटर २०० व्यासाची लोखंडी पाईप लाईन किंमत ५६ लाख ९७ हजार रूपयाचा मुद्देमाल कापुन चोरून नेल्याने खापरखेडा अतिरिक्त अभियंता योगेश श्याम कांत मोहसिल वय ५० वर्ष राह. प्रकाश नगर कॉलोनी खापरखेडा यांच्या तोंडी तक्रारीवरून कन्हान पोस्टे ला अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आरोपी चा शोध घेत होते.
मंगळवार (दि.१२) ला पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामिण यांचे मार्गदर्शनात स्था.गुअशा नागपुर (ग्रा) पथकाने पोलीस स्टेशन कन्हान अप क्र १८२/ २०२२ कलम ३७९ भादंवि गुन्हयाचा समांतर तपासा दरम्यान कन्हान उपविभागात फिरत असता गोपीनाय माहिती मिळाली की, महाजेनको खापरखेडा औष्णि क विद्युत केन्द्र खापरखेडा याची राख वाहुन नेणारी लोखंडी पाइप लाईन गॅस कटर चे साहाय्याने कापणी करून अजय शिवपुजन गौतम रा खदान न ३ झोपड पट्टी याने त्याचे साथीदार सोबत मिळून चोरी केलेली आहे व तो सध्या आपल्या मोहल्लात आहे. अशी खात्रीपूर्वक माहिती मिळाल्याने नमूद ठिकाणी जाऊन उशिरा रात्री त्यास ताब्यात घेऊन गुन्हा बाबत सखोल विचारपुस करून त्याने आपले साथीदार १) अमितसिंग प्रताप सिंह चौहान, २) मनोज धनई पटेल (कुर्मी), ३) राजेश रामावत सहानी, ४) संजय विद्या चौहान, ५) संदीप मोनु नायक, ६) सरकार कुलदीप नायक, ७) महेश कुमरे, ८) प्रकाश सोनवणे सर्व राह कन्हान तसेच कळ मना नागपूर येथील कबाडी १) सुनील शाहु २) सोनु शाहु व त्याचे दोन-तीन साथीदार मिळुन आम्ही चोरी केली असे सांगितल्याने अनु क्र १ ते ५ आरोपींना त्या ब्यात घेऊन पुढील तपास कामी पोलीस स्टेशन कन्हा न च्या स्वाधिन करून पसार ७ ते ८ आरोपीचा शोध घेत आहे. ही कारवाई स्थानिय गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर ग्रामिण पथक सपोनि अनिल राऊत, हे कॉ. नाना राऊत, अरविंद भगत, पोलीस नाईक शैलेश यादव, वीरेंद्र नरड चालक सफो साहेबराव बहाळे यांनी शिताफीतीने करित पार पाडली.