सपना मुनगंटीवार यांना ‘लोकमत ग्लोबल सखी एक्सलन्स अवार्ड’

– समाजाच्या विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव

चंद्रपूर :- कुटुंबाचा सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत नव्या पिढीवर आदर्श असे संस्कार करणाऱ्या तिरुपती बालाजी देवस्थान बोर्डाच्या माजी विश्वस्त सपना सुधीर मुनगंटीवार यांना अलीकडेच सिंगापूर येथे ‘लोकमत ग्लोबल सखी एक्सलन्स अवार्ड’ने गौरविण्यात आले. पुरस्काराबद्दल समाजाच्या विविध स्तरातून सपना मुनगंटीवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या अर्धांगिणी सपना मुनगंटीवार यांना महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे दैनिक म्हणून नावलौकीक असलेल्या लोकमत समूहातर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्यामुळे त्याचे विशेष एक महत्त्व आहे. एक संवेदनशील महिला कार्यकर्ता, कुटुंबवत्सल व कर्तव्यदक्ष गृहिणी ही तर त्यांची ओळख आहेच, शिवाय कुठल्याही कार्यात कल्पक आणि उत्तम नियोजन हे देखील त्यांचे वैशिष्ट्य आहे.

समाजासाठी चांगले काहीतरी करण्याची धडपड त्यांच्या कृतीतूनच बघायला मिळते. आंध्र प्रदेशातील श्री तिरुपती बालाजी देवस्थानच्या विश्वस्त म्हणून त्यांनी पार पाडलेली जबाबदारी सर्वांचे विविध सामाजिक उपक्रमांतून अनेकांच्या जीवनात आशेचा किरण ‘लोकमत ग्लोबल सखी एक्सलन्स अवार्ड’साठी माझी निवड केल्याबद्दल मनापासून आभारी आहे. ‘मराठी’ माणसाचा अभिमान असलेल्या ‘लोकमत’ ला यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा’, या शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कुलरचा वापर सावधगिरीने करून मृत्यूला थांबवा

Fri Mar 29 , 2024
नागपूर :- नागपूरसह संपुर्ण विदर्भात ऊनाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे, तापमानाचा पारा सातत्त्याने वर-वर जात आहे. या वाढत्या तापमानाची दाहकता कमी करण्यासाठी घरोघरी व कार्यालयांतून कुलरचा वापर सुरु होत आहे. कुलर वापर करतेवेळी काही शुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने आणि योग्य खबरदारी न घेतल्यास आपल्या घरातील कुलर मृत्यूचे कारण बनू शकते. गेल्या काही वर्षांमध्ये कूलरचा करंट लागून अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com