लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ – नागपूर विभागात एक नामनिर्देशनपत्र दाखल

नागपूर :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४च्या पहिल्या टप्प्यासाठी आज नागपूर विभागातील पाच लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक अधिसूचना जारी झाली असून नामनिर्देशपत्र भरण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये एक नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहे.

नागपूर लोकसभा मतदारसंघातून व्यंकटेश्वरा महा स्वामीजी यांनी भारतीय जनता पक्षाच्यावतीने एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.

विभागातील भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, रामटेक आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही.

विभागातील पाचही लोकसभा मतदारसंघासाठी बुधवार दिनांक २० मार्च रोजी अधिसूचना जारी झाली आहे. २७ मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल तर २८ मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. ३० मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर ४ जून रोजी मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे. ६ जून पर्यंत आदर्श आचारसंहिता लागू राहणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जुन्या नगर परिषद कार्यालयात पटवारी व महसुल विभाग कार्यालय स्थानांतरित करण्याची मागणी..

Thu Mar 21 , 2024
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  सामाजिक कार्यकर्त्यांचे नप मुख्याधिकार्यांना निवेदन.. कन्हान : – कन्हान येथील महसुल विभागाचे (आर .आय, रेव्हेन्यू इन्स्पेक्टर,तलाठी) कार्यालय जुन्या नगर परिषद कार्यालयात/इमारत मध्ये कायमस्वरुपी स्थानांतरित करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी नगर परिषद मुख्याधिकारी रविंद्र राऊत यांची भेट घेऊन या ज्वलंत विषयावर सकारात्मक चर्चा करुन आणि या संदर्भात लेखी निवेदन पत्र देऊन मागणी करण्यात आली .   कन्हान – पिपरी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!