लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ : नागपूर विभागात आजपर्यंत ४० नामनिर्देशनपत्र दाखल

–  एकूण ३० उमेदवारांनी आज दाखल केले नामनिर्देशनपत्र

– नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची २७ मार्च अंतिम मुदत

नागपूर :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पहिल्या टप्प्यासाठी नागपूर विभागातील पाच लोकसभा मतदासंघात आतापर्यंत एकूण ४० नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत. यापैकी आज नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी ११ , रामटेकसाठी ६,चंद्रपूरसाठी ७,भंडारा-गोंदियासाठी ४ आणि गडचिरोली-चिमूरसाठी २ अशा एकूण ३० उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. या पाचही मतदारसंघांमध्ये उद्या बुधवार, २७ मार्च २०२४ ही नामनिर्देशपत्र दाखल करण्याची अंतिम तारिख आहे.

नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी आज ॲड. उल्हास दुपारे (अपक्ष), संतोष चव्हाण (अपक्ष), बबिता अवस्थी (अपक्ष), विनायक अवचट (अपक्ष), श्रीधर साळवे (भीम सेना), सचिन वाघाडे (अपक्ष), ॲड. पंकज शंभरकर (अपक्ष), विशेष फुटाणे (बहुजन रिपब्लिक सोशलिस्ट पार्टी) आणि आदर्श ठाकूर (अपक्ष), किवीनसुका सुर्यवंशी (देश जनहित पार्टी) यांनी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल केला. तर विकास ठाकरे (इंडियन नॅशनल काँग्रेस) यांनी चार उमेदवारी अर्ज दाखल केले. यापूर्वी नागपूर लोकसभा मतदारसंघातून ५ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत.

रामटेकसाठी गोवर्धन सोमदेवे (अपक्ष), ॲड. उल्हास दुपारे (अपक्ष), उमेश खडसे (राष्ट्र समर्पण पार्टी), शंकर चहांदे (वंचित बहुजन आघाडी), संदीप गायकवाड (अपक्ष), आशिष सरोदे (भीमसेना) यांनी अर्ज दाखल केले. आतापर्यंत एकूण 7 अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातून अशोक नेते (भाजपा, २) आणि बारिकराव मडावी (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, १) यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. यापूर्वी २ उमेदवारांनी गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातून नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून अजयकुमार भारतीय (अपक्ष,१), सुमित पांडे(अपक्ष,१), विरेंद्र कुमार जयस्वाल (अपक्ष,२ ), विलास राऊत (अपक्ष,१ व बसपा १) यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये नामनिर्देशनपत्र दाखल केले. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत ६ उमेदवारांनी ९ नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत.

चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून आज एकूण ७ उमेदवारांनी ११ नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत.

विभागातील पाचही लोकसभा मतदारसंघासाठी बुधवार दिनांक २० मार्च रोजी अधिसूचना जारी झाली आहे. २७ मार्च ही उमेदवारी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची शेवटची तारीख असून सकाळी ११.०० वाजेपासून दुपारी ३.०० वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहेत. २८ मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येईल . ३० मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पोलिसांच्या सतर्कतेने दरोडेखोरांचा दरोड्याचा प्रयत्न फासला

Wed Mar 27 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- वाढत्या घरफोडीवर अंकुश साधण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या परिमंडळ क्र 5 च्या गुन्हे शाखा नागपूर चे घरफोडी विरोधी पथकाच्या सतर्कतेमुळे घोरपड ते शिरपुर रोड च्या मार्गावर लुबाडणूक, घरफोडी व दरोडा टाकण्याचा कट रचून बसलेल्या चार दरोडेखोर आरोपीना ताब्यात घेण्यात पोलिसांना गतरात्री साडे दहा वाजता यशप्राप्त झाले असून पोलिसांच्या या सतर्कतेमुळे आरोपींचा दरोड्याचा प्रयत्न फासला.तर या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com