लोहमार्ग पोलिस हवालदार एसीबीच्या जाळयात

-अडीच हजाराची लाच स्वीकारली  

– रेल्वे स्थानकावर एसीबीची कारवाई

नागपूर :-अडीच हजार रुपयाची लाच स्वीकारणार्‍या पोलिस हवालदारास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. शैलेश उके (46) असे अटकेतील हवालदाराचे नाव आहे. तो नागपूर, लोहमार्ग ठाण्यात हवालदार या पदावर कार्यरत आहे. 20 वर्षीय तरुणाच्या तक्रारीवरून एसीबीने गुन्हा नोंदविला होता. या घटनेमुळे लोहमार्ग पोलिस वर्तुळात चर्चेला उधान आले असून अनेकांची धडधड वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,25 मे रोजी तक्रारदार तरुण रेल्वेने लग्न समारंभासाठी जात होता. नातेवाईकांनी त्याला येताना दारू आणण्यास सांगितले होते. त्याने दुकानातून दारू खरेदी केली आणि गाडीत बसला. मात्र रस्त्यातच पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्यावर लोहमार्ग पोलिस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. याप्रकरणाचा तपास पोहवा उके यांच्याकडे सोपविण्यात आला.

उकेने पीडित तरुणाला भेटायला बोलावले. आरोपपत्र दाखल करण्यापूर्वीच प्रकरणातून वगळयासाठी 3 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर उके अडीच हजार रुपये घेण्यास तयार झाला. दरम्यान तरुणाने प्रकरणाची तक्रार एसीबीकडे केली. दोन दिवसांपूर्वी एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली. यात तक्रार खरी असल्याचे स्पष्ट झाले. उके यांना पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. ठाण्यातच त्याला रंगेहात पकडले. त्यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. उके यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येईल. ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, उपअधीक्षक महेश चाटे आणि अनामिका मिर्झापुरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक शिवशंकर खेडेकर, नितीन बलिंगवार, पोहवा राम शास्त्रकार, सचिन किन्हेकर आणि प्रकाश धमगाये यांनी केली.

अशी झाली कारवाई

तक्रारदार युवकाला सोमवारी दुपारच्या सुमारास उके याने लोहमार्ग ठाण्यात बोलाविले. ठरल्या प्रमाणे युवक ठाण्यात पोहोचला. उके लाच रक्कम स्वीकारत असतानाच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाट पकडले. पथकातील सदस्यांनी उकेला जागचे हलूच दिले नाही. लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या मागचा आणि पुढचा दोन्ही दारातून पोलिस घुसले. त्यामुळे उकेला संधीच मिळाली नाही. एवढेच काय तर कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्‍यांनाही काही समजले नाही. पाच मिनीटातच एसीबीचे पथक उकेला घेवून गेले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Under Rozgar Mela, PM to distribute about 70,000 appointment letters to newly inducted recruits in Government departments and organisations on 13th June

Tue Jun 13 , 2023
NEW DELHI :- Prime Minister Narendra Modi will distribute about 70,000 appointment letters to newly inducted recruits on 13th June, 2023 at 10:30 AM via video conferencing. Prime Minister will also address these appointees on the occasion. The Rozgar Mela will be held at 43 locations across the country. The recruitments are taking place across Central Government Departments as well […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com