संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- मानवी जीवन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी संतांच्या सानिध्यात राहून देवाचे नामस्मरण करावे,मानवाच्या जीवनाला कधी कोणत्या ठिकाणी कलाटणी मिळेल हे सांगता येत नाही .मानवी जीवन मोबाईलच्या रेंजप्रमाणे आहे.जीवात्मा जन्माला आल्यावर भगवंताचे नामस्मरण करणे हे आपले कर्तव्य आहे असे मौलिक प्रवचन कथा व्यास आचार्यश्री हरी यांनी न्यू येरखेडा येथील अलंकार नगर परिसरात अनिल यादव व समस्त यादव(भरैय्या) कुटुंबियांच्या वतीने आयोजित संगीतमय श्रीमद भागवत सप्ताह ज्ञान यज्ञ कार्यक्रमात व्यक्त केले.याप्रसंगी हजारोच्या संख्येत भाविकगण उपस्थित होते.
अलंकार नगर न्यू येरखेडा येथे अनिल गंगाधर यादव व समस्त यादव परिवार च्या वतीने 5 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी पर्यंत संगीतमय श्रीमद भागवत सप्ताह ज्ञान यज्ञ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात भागवत कृपा आश्रम वृंदावन चे कथा व्यास आचार्यश्री हरी प्रवचन देत आहेत.5 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान आयोजित श्रीमद भागवत कथा कार्यक्रमा नुसार रविवार 5 फेब्रुवारीला देवस्थापणा ,श्रीमद भागवत पूजन ,गोकर्ण उपाध्यान, 6 फेब्रुवारीला भीष्म स्तुती ,कुंती स्तुती,कपिलोपाख्यान,7 फेब्रुवारीला ध्रुव चरित्र ,अजमिल कथा,नरसिंह अवतार ,8 फेब्रुवारीला वामन अवतार ,श्री गंगा अवतरण,राम जन्म,श्री कृष्ण जन्मोत्सव,आज 9 फेब्रुवारीला बाल लीला ,माखन चोरी लीला,छप्पन भोग,गोवर्धन लिला यावर प्रवचन देण्यात आले तर उद्या 10 फेब्रुवारोला गोपी गीत,उद्धव गोपी संवाद,श्री कृष्ण रुक्मिणी विवाह ,11 फेब्रुवारीला सुदामा चरित्र ,उद्धव कृष्ण उपदेश ,परीक्षित मोक्ष,12 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजता यज्ञ पूर्णाहुती तर दुपारी 2 ते सायंकाळी 5 पर्यंत अमृत भंडारा चे कार्यक्रम आयोजित केले आहे.
या श्रीमद भागवत कथा ने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून या श्रीमद भागवत कथा कार्यक्रमात मोठ्या संख्येत भविकगण उपस्थित राहून सहभाग नोंदवित आहेत.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवसेना कामठी शहरप्रमुख मुकेश यादव, अणिल यादव, कृष्णा(पटेल)यादव, विक्रम यादव, आशु यादव,निशांत यादव, आयुष यादव,सौरभ यादव,कार्तिक यादव आदी मोलाची भूमिका साकारीत आहेत.