नागपूर :- लोकसभा निवडणूकीत मोदी, भाजपाचे हिंदुत्व अपयशी ठरल्यामुळे राज्यात महायुतीला सत्तेवर असताना देखील मतदाराने सपाटून चोप दिला यामुळे अवघ्या १७ लोकसभा जागा मिळालेल्या महायुतीने विधानसभा निवडणूकीत, काळ्या पैशाचा प्रचंड गैरवापर, सरकारी आश्वासनांचा प्रचंड गैरवापर, सरकारी आश्वासनांचा पाऊस व संशयाच्या घे-यातील ईव्हीएम व मतदान पध्द्ती या आधारे महायुतीने अनेपक्षीत विधानसभा निवडणूकीत यश मिळविले, काँग्रेस उध्दव ठाकरे शिवसेना व शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय बालेकिल्ले उध्वस्थ केले त्याच महायुतीचे राज्यात निवडणूक निकाल लागल्यानंतर जवळपास १२-१३ दिवसानंतर, विशेष म्हणजे सरकार बनविण्याच्या प्रक्रियेपासून राज्यपाल व राजभवन यांना दुर ठेवल्यानंतर आजपासून महाराष्ट्रात महायुतीत सरकार विदर्भवादी, भाजपा नेते देवेन्द्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी आरूढ झाल्यामुळे आतातारी विदर्भीय जनतेला न्याय मिळतो का हेच पाहने उचीत ठरेल की पुन्हा एकदा विदर्भवासीयांच्या आशा आकाक्षांना वाटाण्याच्या अक्षता वाटल्या जातील असे उद्गार बीआरएसपी उत्तर नागपूर जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी काढले. अँड माने पुढे म्हणाले की, आजपासून महायुतीचा भरभक्कम विधानसभा सदस्याचा पाठींबा असलेल्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेन्द्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झालेला आहे तर शिवसेना व राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर ज्या विदर्भातील मतदारांनी भाजपा महायुतीला विदर्भात भरभरून यश दिल्यामुळे विदर्भीय जनतेच्या प्रश्नांना मुख्यमंत्री म्हणून देवेन्द्र फडणवीस किती न्याय देतात हाच विदर्भासाठी अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे.
विदर्भातील शेतकरी आत्महत्या, शेतक-यांची कर्जमाफी, शेतीला मोफत वीजपुरवठा, धान-सोयाबीन उत्पादक शेतक-यांना योग्य बाजारभाव, विदर्भात औद्योगीक गुंतवणूक व नवे उद्योगधंदे त्या माध्यमातून नोकर निर्मिती, गडचिरोली, भंडारा सारख्या जिल्हयातून होणारे सरकारी भूसंपादन व गोखेखुर्द धरणग्रस्तांचे पुनर्वसन यासारख्या अनेक प्रश्नांना देवेन्द्र फडणवीस किती न्याय देतात की यापूढेही विदर्भातील शिक्षित तरूणांना सरकारी नोक-या साठी मुंबई-पूणे कडे भटकावेच लागेल हे करणे नक्कीच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समोर आव्हाण असणार आहे. यापूर्वीही विदर्भातून अनेक केंद्रिय मंत्री, राज्यमंत्री सत्तेत होते आणि आहेत तरीदेखील विदर्भहा स्वतंत्र विदर्भराज्य निर्मिती पासून ते आर्थिक अनुशेष आहे. त्यामुळे विदर्भवासी आत्तापर्यंत महाराष्ट्राची सत्ता ही मुंबई, पूणे कडेच असल्यामुळे विदर्भाला न्यायमिळत नाही, विदर्भावर अन्याय होतो अशी ओरड करायची ती आतामात्र देवेन्द्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळे अजीबात करता येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. विदर्भाच्या विविध प्रश्नाबाबत लवकरच बीआरएसपीचे शिष्टमंडळ राज्याच्या मुख्यमत्र्याना भेटणार असून निवेदने देऊन चर्चा करून सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अँड.डॉ. माने यांनी सांगीतले. बीआरएसपी आगामी निवडणूका लढविणार असून त्याकरीता पक्ष सदस्यता व संगटना याची जोरदारपणे पक्ष कार्यकर्त्यांनी बांधनी करावी व भविष्यातील आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी पक्ष यंत्रनेने सज्ज रहावे. असे आवाहन अँड माने यांनी पक्षा कार्यकर्त्यांना याप्रसंगी केले. याप्रसंगी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश पाटील, एल.के.मडावी, विश्रांती झांबरे, सी.टी.बोरकर, पंजाबराव मेश्राम, डॉ.विनोद रंगारी प्रामुख्याने उपस्थित होते.