चला, मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडू या..

मतदार यादीतील स्वत:ची ओळख प्रमाणित करु या

नागपूर  : भारत निवडणूक आयोगानी मतदार यादीशी आधार क्रमांक जोडण्याबाबत निवडणूक कायद्यामध्ये बदल केला असून याचा उद्देश कायदेशिर तरतूदीस अनुसरुन असून मतदारांची ओळख प्रस्थापित करणे आणि मतदार यादीतील नोंदीचे प्रमाणिकरण करणे, एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदारसंघात एकाच व्यक्तींच्या नावाची नोंदणी ओळखणे हा आहे.

मतदारांचे ओळखपत्र आधार कार्ड क्रमांकाशी जोडणीसाठी नमूना 6-ब या अर्जाचे वाटप संबंधित मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांचे मार्फत 23 सप्टेंबरपर्यंत करण्यात येणार असून मतदारांनी या नमून 6-ब मधील अर्ज निट भरुन संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे 24 सप्टेंबरपूर्वी जमा करावे.

मतदारांना भारत निवडणूक आयोग यांचे nvsp.in या संकेतस्थळाला भेट देवून अथवा आपले मोबाईलमध्ये Voter Helpline App डाऊनलोड करुन स्वत:ची आय.डी. तयार करुन आधार कार्ड क्रमांकाशी मतदान कार्डाची जोडणी करुन घ्यावी.

भारत निवडणूक आयोगामार्फत आधार कार्ड जोडणीला दुहेरी सुरक्षा देण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांनी निसंकोच आपले आधार कार्ड मतदान कार्डशी जोडणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

आदिवासी विद्यार्थ्यांचा नामांकित इंग्रजी माध्यम शाळेच्या शिक्षणापासून वंचित करुन दिशाभूल

Thu Sep 15 , 2022
नागपूर :- दिनांक 13 सप्टेंबर रोजी आदिवासी प्रकल्प विकास विभाग नागपुर यांच्याद्वारे नामांकित इंग्रजी माध्यम शाळेची यादी तात्काळ लावण्या बाबत मा.अप्पर आयुक्त ठाकरेंना आदिवासी विकास विभाग नागपूर यांना गोंडवाना गणतंत्र पार्टी, गोंगपा महीला प्रकोष्ठ, गोंगपा युवा मोर्चा यांच्या वतीने निवेदन देण्यात आले व आदिवासी प्रकल्प विकास विभाग नागपूर यांच्या द्वारे आदिवासी समाजाच्या मुलांच्या शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासाठी नामांकित इंग्रजी माध्यम शाळेत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com