– बुथ प्रमुखांच्या मेळाव्यात “मेरा बुथ सबसे मजबुत” चा निर्धार
यवतमाळ :- “अबकी बार चारसो पार” चा नारा सार्थ ठरवायचा आहे. मोदीना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. त्यासाठी प्रत्येक बुथवर महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांना ५१ टक्के मतदान मिळवून द्या, असे आवाहन जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष श्याम जयस्वाल यांनी स्थनिक उत्सव मंगल कार्यालयात आयोजीत “बुथ प्रमुख आणि वारीअर्स” मेळाव्यात केले. यावेळी उपस्थित हजारो बुथ प्रमुखांनी महायुतीच्या उमेदवार राजश्री यांच्या विजयाचा निर्धार केला.
लोकसभा प्रचाराच्या रणधुमाळीत आज भाजपाने स्थानिक उत्सव मंगल कार्यालयात “बुथ प्रमुख आणि वारीअर्स” मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला लोकसभा विस्तारक सुनीलजी धोटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बाळासाहेब शिंदे, शहराध्यक्ष शंतनु शेटे, तालुकाध्यक्ष चिंतामन पायघन, गजानन गुल्हाने, दत्ताभाऊ रहाणे, सुनिल टेमकर, सुजित रॉय, भारत ब्राम्हणकर, अश्विन बोपचे, मनोज इंगोले, आदि प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मेळाव्याला संबोधीत करतांना जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष श्याम जयस्वाल यांनी , बुथ वरील कार्यकर्त्यांची जबाबदारी किती महत्वाची आहे, हे विषद केले. जयस्वाल म्हणाले की, मोदींजीना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. भारताला परम वैभव प्राप्त करून द्यायचे आहे. अबकी बार चारसो पार जायचे आहे. त्यासाठी आपल्याला महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांना प्रत्येक बुथवरुन ५१ टक्कें मतदान मिळवून द्यायचे आहे. ही किमया साधायची असेल तर प्रत्येक बुथप्रमुखाने प्रचंड मेहनतीने काम करने गरजेचे आहे. मोदीनी सर्वसामान्य मानसासाठी अनेक योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहचविल्या आहेत, आता आपल्याला सर्वांचे प्रेम आणि कुतज्ञता मतदानाच्या रुपातुन त्यांच्यापर्यंत पोहचवायची आहे. असे मार्मिक आवाहन केले.
कार्यक्रमाचे संचलन सुनिल टेमकर तर आभार सुजित राय यांनी मानले. बुथ प्रमुखांना प्रचार किट वापट करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.