संदीप बलविर, प्रतिनिधी
ग्रामपंचायत सातगाव येथे जागतीक महिला दिन उत्साहात साजरा
नागपूर :- नव्या युगाची मी नव महीला, आहे मनस्वीनी।
न मी दासी ,न मी देवता ,जगेन माणूस म्हनूनी!!
आजघडीला महिला प्रत्येक क्षेत्रात उच्च पदावर विराजमान होत असल्या तरी मुलगी नको मुलगाच हवा म्हणून मुलींना मातेच्या पोटातच मारून कन्या भ्रूण हत्या सारखे पातक समाजातील अनेक लोकं करीत असून हे आता थांबायला पाहिजे.महिलांचे संरक्षण व सक्षमीकरणासाठी शासन स्तरावर जरी प्रयत्न होत असले तरी आजची महिला खरच सुरक्षित आहेत काय?समाजात चारही दिशेने नजर फिरवली तरी कित्येक पुरुष हा पर स्त्री कडे कशा हपापलेल्या नजरेने बघत असतो हे रोजच टीव्ही, वर्तमानपत्रात किंवा सोशल मीडियावर ऐकला वाचायला मिळत.त्याकरिता प्रत्येक पुरुषांनी स्त्रीला समाजात माणूस म्हणून जगू द्यावे असे मत सामाजिक अभ्यासक नेणता टिपले यांनी सातगाव येथे आयोजित जागतिक महिला दिनानिमित्य उपस्थितांना मार्गदर्शन करताना मांडले.
ग्रामपंचायत सातगाव येथे जागतीक महिला दिनाचे औचित्य सरपंच योगेश सातपुते यांनी जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या महिलांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कोरोणा काळात आपल्या जीवाची पर्वा न करता उत्तम कामगिरी करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका,ग्रामपंचायत कर्मचारी यांचा कोरोणा योध्दा म्हणून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून नागपूर जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदा राऊत तर प्रमुख अतिथी म्हणून हिंगणा पंचायत समिती सभापती सुषमा कावळे, ग्रा प वाघदरा सरपंच शोभा माहुरे ,सरपंच सातगाव योगेश सातपुते,उपसरपंच प्रविणा शेळके आदी उपस्थित होते. तर या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून सामाजिक अभ्यासक नेणता टिपले ह्या होत्या.यावेळी सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,माता रमाई,अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी ग्रमपंचायत सदस्य सुनिता भुसारी पल्लवी कैकाडी, सुनिता गोडघाटे,ज्योत्स्ना कोल्हे,कल्पना ढाकने,निता नागपुरे, नंदकिशोर कांबळे व शेकडो महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन प्रियंका सातपुते तर आभार प्रविणा शेळके यांनी मानले.