– अमरदिप बडगे
– पाच शेळ्या सह कोंबड्या केल्या फस्त..
– बिबट्याला वन विभागाने केले जेरबंद..
गोंदिया – गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्या अंतर्गत येत असलेल्या ग्राम शिंदिपार येथील एका शेतकऱ्याच्या गोठ्यात बिबट सिरला, बिबटने गोठ्यातील पाच शेळ्या आणि 5 कोंबड्या फस्त केल्या आहेत. शिंदिपार येथील शेतकरी सुरेश शंकर कापगते यांच्या पडक्या गोठ्यात जनावरे बांधलेली होती, दरम्यान म्हसी, गाई, शेळ्या, आणि कोंबड्या वेगवेगळ्या रूम मध्ये होत्या रात्री अंदाजे १० वाजता बिबट जनावरांच्या गोठ्यात खिडकितून शिरला आणि एका शेळीला ठार केले सेळीचा आवाज येताच शेतकरी सुरेश कापगते हे गोठ्यात पाहण्यासाठी गेले असता त्यांच्यावर बिबट्याने हल्ला चडविला होता. शेतकऱ्यांनी वेळीच दार लावत बिबट्याला आत मध्ये कोंबून ठेवत याची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाने रात्रीच नवेगाबांध येथील रेस्क्यु टीम घटनास्थळी दाखल होत. दोन तासाच्या अथक परिश्रमाने बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. मात्र शेतकऱ्याच्या शेळ्या बिबट्याने फस्त केल्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.