विधिमंडळ अधिवेशन : माध्यम कक्षाचे उद्घाटन

– जयश्री भोज यांचा पत्रकारांशी संवाद

नागपूर :- विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी सिव्हील लाईन्स येथील ‘सुयोग’ निवासस्थानी उभारण्यात आलेल्या माध्यम कक्षाचे उद्घाटन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सचिव तथा महासंचालक जयश्री भोज यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जयश्री भोज यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, “प्रसार माध्यमे हा लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ असून शासनाच्या विविध योजना, निर्णय यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये माध्यमांचे योगदान मोलाचे आहे. पत्रकारांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत सहकार्य करण्यात येईल”, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी इतर विविध मुद्यांच्या अनुषंगानेही चर्चा करण्यात आली. माध्यम कक्षामध्ये पत्रकारांसाठी संगणक, वायफाय सुविधेसह इतर सर्व आवश्यक सुविधा देण्यात आल्या आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नागपूर संचालक कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या ठिकाणी पत्रकारांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महासंचालक जयश्री भोज यांनी यावेळी या सोयी-सुविधांची पाहणी केली. त्याचबरोबर आरोग्य कक्षाची पाहणी केली. या सोयी-सुविधांबाबत पत्रकारांनी यावेळी समाधान व्यक्त केले.     याप्रसंगी संचालक (प्रशासन) तथा नागपूर विभागीय संचालक हेमराज बागुल, संचालक (वृत्त व जनसंपर्क) डॉ.p राहुल तिडके, उपसंचालक (वृत्त) दयानंद कांबळे, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर, नागपूर शिबिर प्रमुख विवेक भावसार, सह शिबिर प्रमुख प्रवीण पुरो, महेश पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राजेंद्र बारई यांच्यासह विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विधिमंडळाच्या कामकाजाला ‘वंदेमातरम्’ने सुरूवात

Mon Dec 19 , 2022
नागपूर :- विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास आज ‘वंदेमातरम्’ ने सुरूवात झाली. यावेळी विधानसभेत अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह विधानसभेतील मान्यवर सदस्य उपस्थित होते. तर विधानपरिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!