नागपूर :- विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे 7 डिसेंबर पासून सुरू होत असून या अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे 28 नोव्हेंबर रोजी नागपुर येथे येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
दुपारी 12 वाजता नागपूर विमानतळ येथे आगमन व शासकीय निवासस्थानकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता नागपूर विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षक भंडारा यांच्या समवेत दोन्ही जिल्ह्यातील मुलींवरील वाढते अत्याचार या संदर्भात बैठक. दुपारी 2.15 वाजता विधान भवनातील मंत्री परिषद कक्ष येथे हिवाळी अधिवेशन पूर्वतयारीबाबत विभागातील सर्व अधिकारी यांच्यासमवेत आढावा बैठक. बैठकीनंतर दुपारी 4 वाजता विधानभवन येथे पत्रकारांशी संवाद. रात्री 9 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथून मुंबई कडे प्रयाण