केळवद :- आगामी गटग्रामपंचायत निवडणुक या अनुषंधाने राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे करीता तसेच कोणतेही अनुचित प्रकार घडू नये या करीता सुरतेच्या दृष्टीकोणातून मा. पोलीस अधिक्षक नागपुर जिल्हा नागपुर ग्रामिण याचे आदेशाने दि. २९/१०/२०२३ रोजी चे १२.५० वा. चे दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा नागपुर (ग्रा) येथील स्टॉफ पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचे सह पोलीस हवालदार राजेद्र रेवतकर, रोशन काळे, आशिष मुगले, किशोर वानखेडे, उमेश फुलवेल, प्रमोद भोयर, संजय बान्ने महिला पोलीस हवालदार कविता बचले पोलीस नायक बनिता शेंडे, चालक पोलीस अंमलदार सुमित बांगडे यांचे सह खाजगी, तसेच शासकीय वाहणाने सावनेर उपविभागातील पोस्टे केळवद हददीतील मौजा तिडंग पारधी बेडा येथे मोहाफुल गावठी दारू गाळणा-या इसमावर कार्यवाही करण्यात आली. तसेच पोस्टे केळवद येथील ठाणेदार स.पो.नि अमितकुमार आत्राम, पोलीस महीला व पुरुष कर्मचारी स्टॉफसह रेड केली असता अवैधरित्या मोहापुल गावठी दारु काढणारे एकुण ७ महिला आरोपी हे मोहफुल रसायन सडवा बाळगुन मोहफुलाची गवठी दारूची रनिंग भट्टी काढताना मिळुन आले. आरोपीचे ताब्यातून एकुण मोहाफुल रसायण सडवा ९,५०० लिटर एकुण कि. ७,६०,०००/- रु व मोहफुल गावठी दारु एकुण किंमती ३७५ लिटर एकुण कि. ३७,५००/- व दारु गाळण्याचे साहीत्य निळया प्लास्टिक ड्रम, लोखंडी ड्रम, जळाऊ लाकुड, वर पाईप, जर्मन मिले, स्टील झाकणी एकुण किंमती ६६४००/- असा एकुण किं ८६८९००/- चा मुद्देमाल मिळून आल्याने मौक्यावर पंचनामा कार्यवाही करून नष्ट करण्यात आला. आरोपी विरुद्ध पो.स्टे केळवद येथे कलम ६५ (वी) (सी) (ई) (एफ) महाराष्ट्र दारुबंदी अधिनीयम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे…
सदरची कार्यवाही ही हर्ष पोदार पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण डॉ. सॉदप पखाले अपर पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण अजय चांदखेडे उपविभागिय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे स्थानिक गुन्हे शाखा नागपुर (ग्रा), सपोनि अमितकुमार आत्राम, राजेद्र रेवतकर, रोशन काळे, आशिष मुंगले, किशोर वानखेडे, उमेश फुलवेल, प्रमोद भोयर, संजय वान्ते मपोहवा कविता बचले मपोना वनिता शेंडे, चालक सुमित बागडे यांचे सह संयुक्तरित्या कार्यवाही करण्यात आली आहे.