नागपूर :-दिनांक ०७/०६/२०२४ से १६.३७ वा. दरम्यान अनिल म्हस्के सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागिय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर यांना मुखबिरव्दारे मिळालेल्या माहिती वरून मौजा गोंडखैरी मोठया प्रमाणात गावठी हात भट्टीचे दारूची निर्मीती करण्यात येत आहे अशा माहितीवरून अनिल महस्के सहा. पोलीस अधिक्षक यांनी सोबत स्था.गु.शा. नागपूर ग्रामिण, पोलीस स्टेशन सावनेर, केळवद, खापा नागपूर गामिण येथील आर.सी.पी पथक यांचे एक विशेष पथक स्थापन करून गोंडखैरी येथील पारधी वेडयावर रेड कारवाई केली असता एकुण १२ महिला आरोपी व ०५ पुरुष आरोपी नामे १) अवदेश पवार २) बचन दशरथ गजबे ३) श्याम कन्हैया पवार ०४) राजेन्द्र गुलाबराव गुजर ०५) प्रदिप प्रतापराव भोसले (गुड विक्रेता) सर्व रा. गोंडखैरी पारधीवेडा यांनी रनींग भटटी काढतांना मिळुन आल्याने सदर आरोंपीवर कार्यवाही करून सदर प्रकरणात निळया प्लास्टिक व लोखंडी इम. १०२ नग किंमत २०,४०० रूपये, मोहाफुल सडवा २६,५०० लीटर एकुण किमती ५,३०,००० रूपये, काळा गुळ-११६० किलो किंमती ५८,००० रू. जर्मन घमेले-५ किंमती १०००रू. गुड मोजण्याचे इलेक्ट्रीक वजन काटा किंमत १०,००० रू. मोहाफुल गावठी दारू, ६४३ लीटर किंमत ३२.१५० रू., जळाऊ लाकुड, व इतर दारू गाळण्याचे साहित्य, पाईप, असा एकुण ६,५१,५५० रूपयाचा माल जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला. वरील सर्व आरोपींवर मदाका कलम ६५ (b) (c) (e),) (f) अन्वये कार्यवाही करण्यात आली.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक हर्ष पोद्यार, अपर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल म्हस्के सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागिय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर, ओमप्रकाश कोकाटे पोलीस निरीक्षक स्था.गु.शा., सपोनि किशोर शेरकी, आशिष ठाकुर, पोउपनि आशिष मोरखेडे व स्टॉफ, राकेश साखरकर ठाणेदार केळवद व स्टाफ, पोउपनि जगम व खापा येथील स्टाफ, पोउपनि स्वप्निल गेडाम व सावनेर येथील स्टाफ, पोलीस अधिक्षक कार्यालय सावनेर योथील मपोहवा संगिता कोवे बनं ५१९, पोशि नितेश पुसाम ब.नं २२१४ व आर.सी.पी पथक नागपूर ग्रामिण यांनी रेड केली.