नागपूर :- 1 जानेवारीला पुणे परिसरातील भीमा कोरेगाव येथील शौर्यस्तंभास अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो जनता एकत्र होत असते. त्यांच्या जाण्या येण्यासाठी सोय म्हणून रेल्वेने 29 डिसेंबर ते 3 जानेवारी पर्यंत पुणे व मुंबईसाठी अतिरिक्त रेल्वे गाड्या सोडाव्या अशी मागणी बसपा ने केंद्रीय रेलमंत्री अश्विनी वैष्णव यांना डी आर एम तुषार कांत पांडेय नागपूर च्या वतीने निवेदनाद्वारे केलेली आहे.
बहुजन समाज पार्टीचे नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, माजी प्रदेश सचिव रंजना ढोरे, जिल्हा सचिव अभिलेश वाहाने, माजी नगरसेवक संजय जयस्वाल, माजी जिल्हाध्यक्ष राजकुमार बोरकर, युवानेते सदानंद जामगडे, उत्तर नागपूरचे अध्यक्ष जगदीश गजभिये, विवेक सांगोळे, पूर्व नागपूरचे संजय इखार, सचिन मानवटकर, पश्चिम नागपूरचे अंकित थूल, दक्षिणचे शामराव तिरपुडे, राहुल उके आदींनी डी आर एम चे निजी सचिव ओ एस वासनिक यांची भेट घेऊन हे निवेदन दिले.