– चोरीचा कोळसा १७.७९० टन किंमत ८८९५० रूपयाचा पकडुन चार आरोपीवर गुन्हा दाखल.
कन्हान : – मा. पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामिण यांचे आदेशाने पोलीस स्टेशन कन्हान अंतर्गत स्थागुअशा नागपुर (ग्रा) पथकाने गोंडेगाव खदान परिसातील दोन अवैद्य कोळशा टालवर धाड टाकुन वेकोलि खुली खदान येथुन चोरी केलेला १७.७९० टन दगडी कोळ सा किंमत ८८९५० रूपयाचा मुद्देमाल जप्त करून चार आरोपीवर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करिता कन्हान पोलीस स्टेशन च्या स्वाधिन करण्यात आले.
प्राप्त माहीती नुसार उपविभागीय पोलीस अधि कारी कन्हान अंतर्गत वेकोलि उपक्षेत्र कामठी व उप क्षेत्र गोंडेगाव च्या तीन खुली कोळसा खदान परिसरात अवैद्य कोळसा चोरीचा धंदा जोमाने सुरू असुन अवैद्य कोळसा टाल चा ऊत आल्याने असामाजिक तत्वाचा बोलबाला वाढुन सामान्य नागरिकांना त्रास होण्याच्या तक्रारी वाढल्याने पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामिण यांचे आदेशाने स्थानिय गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर ग्रामिण पथकाने कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पेट्रो लिंग करित असताना मिळालेल्या गुप्त माहीती वरून मंगळवार (दि.१५) मार्च च्या पहाटे सकाळी २ वाजता दरम्यान पहिली कारवाई केली असता १) अशोक बलराम यादव राह. टेकाडी वसाहत याचे ताब्यातुन चोरीचा साठवुन ठेवलेला १० टन दगडी कोळसा किम त ५०, ००० रू मिळून आला व त्याने हा कोळसा अभिषेक सिंग राह. इंदर कॉलोनी यांचे करीता घेतला असल्याचे सांगितले. तसेंच लगेच पुन्हा रात्री ३ वाजता दरम्यान दुसरे अवैध कोळसा टाल वर धाड टाकली असता आरोपी नामे राजु धनराज टेकाम वय २४ राह. गोंडेगाव याचे ताब्यात अंदाजे ७.७९० टन कोळसा किमत ३८९५० रूपयाचा मुद्देमाल मिळुन आला. नमुद आरोपीने सदर चा कोळसा उमेश पानतावणे राह. कांद्री याचे करीता घेतला असल्याचे सांगितले. या दोन्ही अवैद्य कोळसा टालवरून चोरीचा कोळसा १७.७९० टन किंमत ८८९५० रूपयाचा जप्त करून यातील आरोपी १) अशोक बलराम यादव राह. टेकाडी वसाहत,२) अभिषेक सिंग राह. इंदर कॉलोनी, ३) राजु धनराज टेकाम राह. गोंडेगाव ४) उमेश पानतावणे राह . कांद्री या चार आरोपी पैकी दोघाना अटक करून दोन फरार आरोपीतांवर कायदेशीर कारवाई करण्या करिता वेकोलि अधिकारी यांचेशी पत्रव्यवहार करून व त्यांच्या कडुन फिर्याद घेऊन तसेच दोन्ही धाडी दर म्यान मिळलेल्या मालाचे वजन करून चारही आरोपी विरुद्ध अनुक्रमे १) अप क्र १३३/२०२२ कलम ३७९, १०९ भादंवि, २) अप क्र १३४ /२०२२ कलम ३७९, १०९ भादंवि अन्वये गुन्हे नोंद करून पुढील कारवाई करिता पोलीस स्टेशन कन्हानचे ताब्यात देण्यात आले . सदर कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर ग्रामिण पथकाचे सपोनि अनिल राऊत, पोहवा विनोद काळे, नाना राऊत, अरविंद भगत, चालक साहेबराव बहाळे यांनी यशस्विरित्या पार पाडली.