नदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ

– अंबाझरी येथून स्वच्छता कार्य सुरू

नागपूर :- नागपूर शहरातून वाहणा-या नद्याची सफाई अभियानाचा सोमवारी १ जानेवारी २०२४ रोजी शुभारंभ झाला. महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावर्षी १ जानेवारीपासून नदी स्वच्छता अभियान सुरू करण्याचे निर्देश दिले होते, त्यानुसार अंबाझरी घाट पासुन नाग नदी सफाई अभियानाला सुरूवात झाली आहे.

दरवर्षी मनपातर्फे उन्हाळ्यात नदी स्वच्छता अभियान राबविण्यात येते. मात्र यावर्षी १ जानेवारीपासूनच अभियानाला सुरूवात करण्यात येत आहे. नाग नदीची लांबी १७.७५ किमी, पिवळी नदीची लांबी १७ किमी आणि पोहरा नदीची लांबी १२ किमी आहे.

नदी स्वच्छतेदरम्यान नदीमधून काढण्यात येणारा गाळ, माती तशीच पडून राहू नये याबाबत विशेष काळजी घेणे, नदीमधून काढण्यात येणा-या मातीचा उपयोग वृक्ष लागवडीसाठी करणे, नदी व नाल्यांमधील पाण्याच्या प्रवाहाला अडथळा होउ नये याची काळजी घेणे या सर्व बाबींकडे कटाक्षाने लक्ष देउन कार्यवाही करण्याचेही निर्देश मुख्य अभियंता राजीव गायकवाड यांनी दिले आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शहर स्वच्छतेसाठी पुढे आले शेकडो हात

Tue Jan 2 , 2024
– मनपाच्या एक तारीख,एक तास,एक साथ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद नागपूर :- नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सकाळी शेकडोच्या संख्येत नागरिक हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरले, स्वयंस्फूर्तीने श्रमदान करीत स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर शहर साकारण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने राबविलेल्या “एक तारीख- एक तास- एक साथ” या अभिनव उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. थंडीची तमा न बाळगता शहर स्वच्छतेसाठी शेकडो हात पुढे आले. मनपाच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com