राष्ट्रीय सिकलसेल निर्मूलन अभियानाचा शुभारंभ

नागपूर :- जिल्हास्तरीय राष्ट्रीय सिकलसेल अभियानाचा शुभारंभ डागा स्मृती शासकीय रुग्णालयात करण्यात आला. यावेळी माजी आमदार डॅा. मिलिंद माने यांची उपस्थित होती.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. अख्तर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रवीण नवखरे, स्त्री रोग तज्ञ डॉ. मुल, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. पांडे, दिशा ह्युमन वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष वामन सोमकुवर, जिल्हा सिकलसेल समन्वयक प्राजक्ता चौधरी, सिकलसेल समुपदेशक संजीवनी सातपुते यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान सिकलसेलग्रस्त व्यक्तींना लाल, वाहक व्यक्तींना पिवळे आणि निरोगी व्यक्तींना पांढ-या कार्डचे वाटप करण्यात आले. तसेच पॉईंट केअर टेस्ट तसेच हायड्रोक्युरिया औषधाविषयीची विस्ताराने माहिती देण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रवादीच सरकारमध्ये सामील झाल्याने ‘मविआ’ नामशेष भाजपा आ. नितेश राणे यांचा घणाघात

Mon Jul 3 , 2023
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच शिवसेना – भाजपा सोबत सरकारमध्ये सामील झाल्याने आता महाविकास आघाडी पूर्णपणे नामशेष झाली आहे अशी टीका भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी सोमवारी केली .भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रदेश प्रवक्ते अभिषेक मिश्रा,ओमप्रकाश चौहान उपस्थित होते. अजित पवार आणि त्यांच्या सहका-यांच्या शपथविधीवर खा. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com