इंडियन स्वच्छता लीग २.० चा शुभारंभ

– सफाईमित्रांसाठी आयोजीत होणार सेवा व सुरक्षा शिबीर

चंद्रपूर :- कचरामुक्त शहर या संकल्पनेला व्यापक रूप देण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. देशाच्या प्रत्येक नागरिकांच्या मनात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण व्हावी आणि स्वच्छतेसाठी युवकांसह नागरिकांनी पुढाकार घ्यावा, या हेतूने केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत इंडियन स्वच्छता लीग सीजन २ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेचा शहर स्तरीय शुभारंभ १५ सप्टेंबर रोजी आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते करण्यात आला. 

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा या अभियानाचे आयोजन केले आहे. या अभियानांतर्गत देशभरातील सर्व शहरांमध्ये १७ सप्टेंबर रोजी इंडियन स्वच्छता लीग ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

या स्वच्छता लीगमधे स्वच्छतेद्वारे समाजाची सेवा करणाऱ्या सफाईमित्रांसाठी सेवा व सुरक्षा शिबीर आयोजीत केले जाणार आहे. पर्यटन स्थळे,टेकड्या, शहराची मुख्य ठिकाणे तरुणांच्या सहभागाने विविध संघांच्या माध्यमातुन स्वच्छ करणे,शहराच्या स्वच्छतेसाठी तरुणाईचा सहभाग वाढविणे,MyGov App च्या माध्यमातुन नोंदणी मोहीम राबविणे इत्यादी कार्यक्रम राबविले जाणार आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

खडकी ग्रामपंचायत सदस्य योगेश नारनवरे यांनी दिला मदतीचा हात

Sat Sep 16 , 2023
नरखेड :- स्थानिक नरखेड तालुक्यातील जलालखेडा सर्कल अंतर्गत असलेले गट ग्रामपंचायत खडकी या ग्रामपंचायतचे सदस्य योगेश नारनवरे यांनी खडकी गावातील काही अपंग व मतिमंद विध्यार्थी व नागरिकांना आपल्या स्वखर्च निधीतून दि. 11 सप्टेंबर रोजी जीवनाआवश्यक वस्तूच्या किटचे वितरण करण्यात आले. अपंग व मतिमंद विध्यार्थी व नागरिकांना काही का ना असो एक आधार व अल्पशी मदत खडकी गट ग्रामपंचायतचे सदस्य योगेश […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com