– चंद्रपूर महानगरपालिकेचे माजी आयुक्त राजेश मोहिते यांची उपस्थिती
नागपूर :- अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत संचालित करण्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था पदविका (LSGD) स्थानिक संस्था सेवा पदविका (LGS) अभ्यासक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून चंद्रपूर महानगरपालिकेचे माजी आयुक्त राजेश मोहिते उपस्थित होते. त्यांच्यासमवेत संस्थेचे विभागीय संचालक जयंत पाठक हे ही उपस्थित होते.
यावेळी राजेश मोहिते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करताना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो व त्यावर कसा मार्ग काढत अतिशय संयमाने तोडगा काढावा हे सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सेवा या प्रभावी असतात. नागरिकांना सेवा नीट मिळाल्या नाही तर कधी कधी रोष ओढावून घ्यावा लागतो. अशा परिस्थितीत त्यांना संयमांने हाताळावे लागते आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येईल, याचा विचार करावा. पदाधिकाऱ्यांच्या प्रश्नावरही शांतपणे उत्तर द्यावे, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. विभागीय संचालक जयंत पाठक यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविक या अभ्यासक्रमाची निर्मिती व इतिहास तसेच महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन अभ्याक्रम समन्वयक मंजिरी जावडेकर यांनी केले. कार्यक्रमाला अविनाश मोहगावकर, रमन शिवणकर, विनय माहूरकर ही अध्यापक मंडळी उपस्थित होती.