नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्धी संघांना नमवून लातूर, मुंबई, पुणे संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. समर्थ व्यायामशाळा प्रताप नगर येथे ही स्पर्धा सुरु आहे.
रविवारी स्पर्धेची उपांत्य फेरी पार पडली. स्पर्धेला खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रेरक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट दिली. सामन्यापूर्वी त्यांनी खेळाडूंशी हस्तांदोलन करून शुभेच्छा दिल्या.
रविवारी स्पर्धेची उपांत्य फेरी पार पडली. १८ वर्षाखालील मुलांच्या वयोगटात लातूर संघाने नागपूर संघाचा २५-१४, २५-१२,२६-२४ ने पराभव केला. मुंबई संघाने पुणे संघाचा २५-१७, २५-१४, २५-१५ ने पराभव केला. याच वयोगटात लातूरच्या मुलींनी देखील स्पर्धेत दबदबा कायम ठेवला. लातूर संघाच्या मुलींनी देखील नागपूर संघाला २५-२१, २१-२५, २५-२२, २५-११ ने नमवून विजय नोंदविला. पुणे संघाने अमरावती ला २५-१३, २५-१९, २७-२५ ने मात दिली.
२१ वर्षाखालील वयोगटातील मुलांच्या स्पर्धेत लातूर संघाने नागपूर ला २५-१६, २५-१४, २८-२६ ने नमविले. मुंबई संघाने पुणे संघाचा २२-२५,२५-२२, २५-२१, २५-२० ने पराभव केला. मुलींच्या स्पर्धेत नाशिकने मुंबईला २५-१४, १७-२५, २५-१७,२५-१० ने नमविले. नागपूर ला पुणे संघाकडून २८-२६, २५-१५, १६-२५, २५-१४ ने पराभव स्वीकारावा लागला.
उपांत्य फेरी निकाल
१८ वर्षाखालील मुले
लातूर मात नागपूर २५-१४, २५-१२,२६-२४, मुंबई मात पुणे २५-१७, २५-१४, २५-१५
मुली :
लातूर मात नागपूर २५-२१, २१-२५, २५-२२, २५-११, पुणे मात अमरावती २५-१३, २५-१९, २७-२५
२१ वर्षाखालील मुले
लातूर मात नागपूर २५-१६, २५-१४, २८-२६, मुंबई मात पुणे २२-२५,२५-२२, २५-२१, २५-२०
मुली :
नाशिक मात मुंबई २५-१४, १७-२५, २५-१७,२५-१०, पुणे मात नागपूर २८-२६, २५-१५, १६-२५, २५-१४