“एक वार्ड एक नगरसेवक” रिपब्लिकन आघाडी लोकशाही मोर्चाचे कमाल चौकातुन स्वाक्षरी अभियानाला सुरूवात

नागपूर :- रिपब्लिकन आघाडी लोकशाही मोर्चाच्या वतीने “एक वार्ड एक नगरसेवक” अभियान अंतर्गत नागरिकांच्या सह्या जमा करण्यात आल्या. 13 सप्टेंबरला दुपारी 4 वाजता कमाल चौक इंदोरा येथून या अभियानाची सुरुवात झाली पायवाट जानारे, सायकल, सायकल रिक्षा, ईरिक्षा, अॅटोरिक्षा, कार मॅटॅडोर, बसवाले नागरिकांनी सहया करण्यासाठी हिरिरिने भाग घेवुन सुरुवात करण्यात आली  अनेक नागरीक प्रभाग पद्धतीचा विरोधात रोष व्यक्त करतांना आढळले. त्यांचे म्हणणे आहे की प्रभाग पध्दतीने निवडुन आलेले नगरसेवक लोकांचे कामे करण्यास टाळाटाळ करीत होते. त्यामुळे एकल वार्ड पध्दतीनेच सरकारने व मुख्य निवडणूक राज्य आयुक्तांनी येणाऱ्या निवडणूक घ्यावी. यावेळी रिपब्लिकन आघाडी लोकशाही मोर्चा चे घनश्याम फुसे, संजय पाटील, विश्वनाथ खांडेकर, एकनाथ ताकसांडे माकपचे अरुण लाटकर, रामेश्वर चरपे, शालिनी राऊत, विनोद जांभुळकर, सुधाकर राऊत, जनता दल से. चे रमेश शर्मा, विजय खोब्रागडे, सुरेश मोटघरे, मो.मिराज, मो.शाहिद, सुधाकर धुर्वे, भाकपचे अरुण वनकर, संजय राऊत, अजय शाहू, रमेश किचारे,  चहांदे एसयुसीआय चे माधव भोंडे, रविंद्र साखरे, आरपिआय बॅ.खो.यशवंत तेलंग आदी कार्यकर्ते भारी संख्येने उपस्थित होते. अभियानाचे अंती मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या नावे निवेदन पाठवण्यात येईल.

सध्या प्रभाग पद्धतीमुळे धनशक्तीचा प्रचंड बोलबाला झाल्याने सर्वसामान्य जनता निवडणूक रिंगणाच्या बाहेर फेकल्या जात आहे. सर्वसामान्य लोक उमेदवारी दाखल करू शकत नाहीत तर सर्वसामान्य मतदारांसमोर धनबल्य किंवा मोठ्या राजकीय पक्षाच्या उमेदवारांशिवाय दुसरा मार्ग नसतो. खरी लोकशाही प्रकट होत नसल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनपा येथे सेवा पंधरवाडा सुरु

Sun Sep 25 , 2022
नागरिकांचे प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढा : मनपा आयुक्त नागपूर :-  नागरिकांच्या तक्रारींची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी, शासनातर्फे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर ‘सेवा पंधरवडा’ साजरा करण्याचे निर्देश महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झाले आहे. हा पंधरवडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजयंती 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ स्वरुपात साजरा करण्यात येत आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com