नागपूर :- आजपासून दीडशे वर्षांपूर्वी महात्मा फुले यांनी शूद्रांना (ओबीसी) प्रस्थापित (ब्राम्हण, भट,जोशी, उपाध्ये) व त्यांच्या मतलबी धर्मग्रंथांच्या मगर मिठीतून (दास्यत्वातून) सोडविण्यासाठी 24 सप्टेंबर 1873 ला सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्या स्थापना दिनाचे बसपा ने स्वागत केले. तसेच 24 सप्टेंबर 1932 ला डॉ. आंबेडकरांना इंग्रजांकडून मिळालेल्या दलितांच्या राजकीय हक्क अधिकाराला पुणे करारच्या माध्यमातून गांधीजी द्वारा आमरण उपोषण करुन छिनण्यात आले. त्या घटनेचा स्वतः बाबासाहेब आंबेडकर यांनी व मान्यवर कांशीरामजी यांनी धिक्कार केला होता.
त्यामुळे नागपूर जिल्हा बसपाच्या कार्यकर्त्यांनी आज 24 सप्टेंबर ला पुणे करारातील त्या षडयंत्रकारी तरतुदींचा धिक्कार केला. पुणे कराराचा स्वतः बाबासाहेब आंबेडकरांना 1945, 1946 ला झालेल्या विधानसभा व संविधान सभेच्या निवडणुकीत जबरदस्त फटका बसला होता. त्यामुळे त्यांनी राष्ट्रीय स्तरावर त्या करार विरोधात सत्याग्रह व जेलभरो आंदोलन करून त्याचा निषेध केला होता.
त्या कराराला पन्नास वर्षे झाली तेव्हा 1982 ला स्वतः कांशीरामजी यांनी त्याचा देशभर मोठ्या प्रमाणात परिषदा घेऊन धिक्कार केला होता. या पुणे करारामुळे आज लोकसभेत अनुसूचित जाती-जमाती च्या 141 व विधान सभेमध्ये दीड हजारावर आरक्षित प्रतिनिधींच्या जागा आहेत. परंतु ही सर्व मंडळी समाजासाठी कार्य न करता आपापल्या पक्ष व आपल्या मालकांच्या इशाऱ्यावर चालत असतात. त्यामुळे राजकीय आरक्षण हे चमच्यांची निर्मिती करणारे साधन झाल्याचा आरोप बसपा नेत्यांनी केला.
आज नागपुरातील संविधान चौकात महाराष्ट्र प्रदेश बसपाचे सचिव पृथ्वीराज शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी बसपाचे प्रदेश सचिव विजयकुमार डहाट, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, बसपाचे मा प्रदेश सचिव व मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग यांनी तर समारोप जिल्हा सचिव डॉ शितल नाईक यांनी केला.
या कार्यक्रमाला मध्य नागपूरचे प्रवीण पाटील, पश्चिम नागपूरचे सनी मुन, दक्षिण पश्चिम नागपूरचे ओपुल तामगाडगे, दक्षिण चे शंकर थुल, माजी नगरसेवक गौतम पाटील, माजी जिल्हाध्यक्ष राजकुमार बोरकर, विलास सोमकुंवर, युवा नेते सदानंद जामगडे, अभिलेष वाहने, योगेश लांजेवार, सुरेश मानवटकर, परेश जामगडे, विशाल बनसोड, बुद्धम राऊत, एड वीरेश वरखडे, एड अतुल पाटील, अनिल मेश्राम, अरविंद तायडे, विलास मून, अरविंद खोब्रागडे, प्रशांत दिवे, मॅक्स बोधी, विजय कांबळे, जितेंद्र पाटील, विवेक कंगाले, संभाजी लोखंडे, राजेंद्र सुखदेवे, जगदीश गेडाम, सुनील कोचे, प्रताप तांबे, सिकंदर वाघमारे, जनार्दन मेंढे, रुस्तम जनबंधू, तनुजा झिलपे आदि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.