बेला :- येथील विमलताई तिडके विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रतिकृतीची विज्ञान प्रदर्शनी भरण्यात आली होती. त्याचे उद्घाटन केंद्रप्रमुख मधुकर पजई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेडेश्वर येथील विद्याधन हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर राऊत, शाळेचे प्राचार्य राजेंद्र तिडके व ज्येष्ठ शिक्षक महेंद्र महाले प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्व प्रथम माता सरस्वती व मिसाईल मॅन डॉ.अब्दूल कलाम यांच्या फोटोला पुष्प हार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. प्रदर्शनी पाहून मान्यवर अतिथिनी तिडके शाळेतील गुणवान विद्यार्थ्यांचे कौतुक केले व समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी उपस्थित असलेले केंद्रप्रमुख यांनी शाळेच्या कार्यकर्तुत्वाचा आपल्या भाषणातून गौरव केला व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
प्रा. रविदास उरकुडे यांनी सूत्रसंचालन केले तर केले तर रवीकर गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले . यशस्वीतेसाठी विज्ञान शिक्षक बी.बी.मुन, संदिप शहाणे ,आर.महाले, पुष्पा भोयर, आणि शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.