स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

मुंबई :- सन 2024 वर्षातील मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी राज्य शासनाच्यावतीने स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार देण्यात येणार आहे. 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर, 2024 या कालावधीत प्रकाशित झालेले प्रथम आवृत्ती पुस्तके स्पर्धेसाठी पात्र आहेत. लेखकांनी पुरस्काराच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून) दि. 31 जानेवारी, 2025 पर्यंत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत मुंबई येथे आपले साहित्य पाठवावीत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400 025 यांच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता अन्यत्र संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामूल्य उपलब्ध आहेत. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ‘नवीन संदेश’ या सदरात ‘स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2024 नियमावली व प्रवेशिका’ या शीर्षाखाली व ‘What’s new’ या सदरात ‘Late Yashwantrao Chavan State Literature Award 2024 Rules Book and Application Form’ या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील. प्रवेशिका पूर्णतः भरुन आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक 1 ते 31 जानेवारी 2025 या विहित कालावधीत पोहचतील अशा पाठवाव्यात.

लेखक / प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात. मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यातील लेखक / प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहित नमुन्यातील प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400 025 येथे पाठवाव्यात. मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून अन्य ठिकाणच्या लेखक / प्रकाशकांनी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये हे साहित्य दिनांक 1 जानेवारी, 2025 ते 31 जानेवारी 2025 या विहित कालावधीत पाठवावे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे.

लेखक / प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका व पुस्तके पाठविताना सदर बंद लिफाफ्यावर / पाकीटावर ‘स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2024 साठी प्रवेशिका’ असा स्पष्ट उल्लेख करावा. प्रवेशिका व पुस्तके स्विकारण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी, 2025 हा राहील. विहित कालमर्यादेनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारल्या जाणार नाहीत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

भेंडाळा येथे आज एक दिवसीय कबड्डी स्पर्धा

Tue Dec 24 , 2024
अरोली :- तारसा – चाचेर जि.प .अंतर्गत येत असलेल्या भेंडाळा येथे ओम स्टार क्रीडा मंडळ द्वारा एक दिवसीय कबड्डी स्पर्धेचे आज दिनांक 24 डिसेंबर मंगळवारला सायंकाळी पाच वाजता आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत 60 केजी वजन गट ची अट ठेवण्यात आलेली आहे. स्पर्धेकरिता गावातील, परिसरातील व तालुक्यातील राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रथम पुरस्कार 15000 ,द्वितीय पुरस्कार दहा हजार, तृतीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!