संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कोळसा, मँग्निज खाणी व उद्योगाच्या सीएस आर मधुन तलावाचे खोलीकरण होऊ शकते.
कन्हान : – नागपुर जिल्हयातील सिमेंटचे जंगले मोठ या प्रमाणात वाढत विहीरी, तलावे बुजुन नामशेष होत असल्याने जमिनीत पाहीजे त्या तसे पाऊसाचे पाणी जिरणे कमी होऊन पाण्याची पातळी खोलवर गेल्याने जिल्हयात पाण्याचे संकट निर्माण होत आहे. यास्तव जिल्हावासीच्या कल्याणार्थ जिल्हयातील संपुर्ण तला वांचे खोलीकरण करून जमिनीत पाण्याचे स्तोत्र पुर्न जिवीत व सुरक्षित करण्याची मागणी शिवसेना माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव हयानी मा. आर विमला जिल्हाधिकारी व योगेश कुंभेजकर मुख्य कार्यपाल न अधिकारी जि.प. नागपुर हयाना केली आहे.
नागपुर जिल्हयात पाण्याचे संकट दरवर्षी उन्हाळ यात जाहीर होते. गावाच्या मागणी प्रमाणे बोरवेल, पाण्याच्या टँकर ने पुरवठा करण्यास या ना त्या मार्गाने प्रचंड पैसा आपातकालीन पाणी पुरवठा योजनेत खर्च केला जातो. जिल्हयात जवळपास ४७५ तलाव आहे. टाटा ट्रस्ट सह इतर सेवाभावी संस्थेच्या माध्यमातुन अंदाजे ५० च्या जवळपास तलावातील गाळ काढुन तलाव खोलीकरनाचे कार्य झाले असे समजते. अनेक वर्षा पासुन या तलावांचे खोलीकरण करण्यात आले नाही. यास अनेक कारणे असतील परंतु इच्छा शक्ती ची कमतरता हा यात महत्वाचा विषय आहेच. नागपुर जिल्हयात अनेक एमआयडीसी, मोठमोठे उद्योग, लहा न ही असंख्य उद्योग आहेत. मॉयल १० व वेकोलि च्या जवळपास २० कोळसा खाणी आहेत. उमरेड, पाचगा व, कळमेश्वर, मौदा, सावनेर, हिंगणा हया भागात उद्यो ग पुष्कळ आहेच. या सर्वाच्या मदतीने जिल्हयातील तलावाचे पुर्नजीवन सहज शक्य आहे. या पवित्र कामी कोणी नाही हे म्हणणार नाही. गरज आहे ते पुढाकारा ची, तलावातील गाळ काढुन हा गाळ शेतकऱ्यांना नि शुल्क देऊन शेतीची सुपीकता वाढवल्या जावु शकते. तलावाचे खोलीकरणाने पाण्याच्या साठ्यात प्रचंड वाढ झाली असती. अनेक ठिकाणी शेतीला पाणी सिंचन करता येणे शक्य आहे. अनेक तलावात मत्स व्यवसायाला चालना मिळाली असती. तलावाच्या आजुबाजुच्या परिसरात पाणी जमीनीत झिरपेल व पाण्याचा स्तर वाढेल, अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीत पाणी मुबलक उपलब्ध होईल.
जिल्हयातील अनेक उद्योगातील जेसीपी, डोजर, ट्रक्टर सह इतर यंत्र आणि मनुष्यबळाचे सहकार्य सहज उपलब्ध करता येते. तलावाचे खोलीकरणाने पाण्याचे प्रचंड साठे व तलाव सुरक्षित होईल. पाणी मुबलक मिळेल. उद्योगाला शेतीला चालना मिळेल. वेकोलि, मॉयल व उद्योग जमीनीतील प्रचंड पाणी नाल्या नाल्यातुन लावारिस फेकण्याचे पाप करीत आहेत. यावर कोणाचा अंकुश नाही. संबंधित पाणीही अडवुन वेगवेगळ्या योजनेतुन जिरविण्याचे काम अग त्याचे आहे. नागपुर महानगर पालिकेत तत्कालीन आयुक्त श्री. तुकाराम मुंडे साहेब असताना नागपुराती ल नागनदी सीएसआर निधीतुन स्वच्छ केली होती. हा चर्चेचा विषय होता. परंतु आता पावसाळा येण्याचे दिवस, पुर्व पावसाळी तलावांचे खोलीकरण या अत्यंत महत्वाच्या कामाकडे डोळेझाक कशासाठी ? पाण्याचे भरमसाठ साठे जिल्हयात असताना बेजबाबदारी मुळे च पुढाकार न घेतल्याने हे दुर्दैवी चित्र पाहण्यात येते. कृपावंत आजही तात्काळ सर्वांचे सहकार्य घेऊन सी एसआर निधीचा वापर केला तर तात्काळ शेकडो तलाव पुर्नजीवीत होवुन जिल्हयात जलसमृद्धी नांदेल. हे न केल्यानेच आतापर्यंत जिल्हयातील अनेक तलाव नामशेष झाले आहे. ही शोकांतिकाच ? तात्काळ आप ण नेतृत्व करून ‘ पाणी हेच जिवन ‘ असल्याने सर्वा च्या सहकार्याने पाणी जोपासना करण्यास नागपुर जिल्हयातील दरवर्षी किमान २०० तलावाचे खोलीकर ण करण्यात आले तर नैसर्गिक पाऊसाचे पाणी तला वात साठवुन जमिनिच्या आत जिरून पाण्याची पात ळी वाढुन परिसर हिरवेगार होऊन वृक्ष संवर्धन, शेती, शेतकरी आणि नागरिकांना सुध्द हवा, ऑक्सीजन व पाण्याचा पुरवठा होण्याचे मानव जीवनातील सत्कर्म घडेल. यास्तव जिल्हयातील तलाव खोलीकरण करून पाण्याचे स्तोत्र पुर्नजीवीत व संरक्षित करण्यात यावे. अशी मागणी आर विमला जिल्हाधिकारी नागपुर तसेच योगेश कुंभेजकर मुख्य कार्यपालन अधिका री जि.प. नागपुर हयाना भेटुन चर्चा करून प्रकाश जाधव शिवसेना माजी खासदार रामटेक लोकस भा क्षेत्र हयानी जिल्हावासी च्या कल्याणार्थ निवेदन देऊन केली आहे. याप्रसंगी विलास बोंबले, पाडुरंग बुराडे, राजेश तुमसरे, मोतीराम रहाटे, संदीप बरडे, दिलीप राईकवार, कैलास कोमरईलवार, सतिश मुंजे, कोठीराम चकोले, ओमप्रकाश काकडे, राजु बारई, रवी भांडवलकर, अशोक मेश्राम, मंगेश, ज्ञानचंद देवळे, चंद्रशेखर नाईक, सुरेश लंगडे सह जिल्हयातील मान्यवरांनी उपस्थित राहुन मागणी केली आहे.