संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– लग्नाआधी नवरदेवाचे रांगेत थांबून मतदान
कामठी :- मतदान करून काय फरक पडणार आहे असे अनेक जण म्हणतात मात्र मतदान करा फरक पडतो असे म्हणत कामठी येथील जयभीम चौक रहिवासी खोब्रागडे कुटुंबातील माजी नगरसेवक राजकुमार उर्फ दादा खोब्रागडे यांचे पुत्र प्रशांत खोब्रागडे नामक नवरदेवाने आधी लगीन लोकशाहीचे नंतर माझं ही संकल्पना मनात घेत लग्नाआधी वऱ्हाडासह संपूर्ण कुटुंबासोबत मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आणि मग लग्न मांडवात गेले.
आज 19 एप्रिल ला रामटेक लोकसभा ची सार्वत्रिक निवडणूक असल्याने सर्वत्र निडणुकीची धुमाळ आहे त्याचवेळी कामठीतील ही लोकसभा निवडणूक एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आला. ते म्हणजे आधी लगीन लोकशाहीचे नंतर स्वतःच… आपल्याला लग्न म्हटलं की डोळ्यासमोर बँड, बाजा आणि बारात हेच येतं. मात्र आज 19 एप्रिल ला खोब्रागडे कुटुंबीयांनी निवडणूक मतदान दिनाचे औचित्य साधून आपल्या लग्नाची सुरुवात आगळ्यावेगळ्या पद्धतीने केली. येथे नवरदेव झालेल्या प्रशांत खोब्रागडेने आधी पोरवाल कॉलेज च्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं आणि नंतरच त्यांनी वरात पुढे नेऊन मंडपात पाय ठेवला. त्यामुळे या प्रशांत खोब्रागडेच्या लग्नाने सर्वांचे लक्ष्य आकर्षित केले.
लग्न म्हटलं की हळद,मेहंदी,संगीत,वरात आणि धम्माल .पण माजी नगरसेवक दादा खोब्रागडे यांचा मुलगा प्रशांत खोब्रागडे नामक या नवरदेवाने आधी मतदान नंतर लग्नाची वरात पुढे नेऊन लग्नमंडपात गेल्याने समाजापुढे लोकशाहीचा आदर्श ठेवत स्वतःच्या लग्नाची एक वेगळी ओळख केली.
कामठी येथील स्मूर्तीशेष माजी नगरसेवक दादा खोब्रागडे व रमाबाई खोब्रागडे यांचा मुलगा प्रशांत खोब्रागडे यांचा यवतमाळ जिल्ह्यातील नेर तहसील अंतर्गत येणाऱ्या कोलुरा गावातील विष्णू श्रीरामे यांची तृतीय कन्या अस्मिता हिच्याशी विवाह ठरला आहे.या दोघांचे लग्न आज 19 एप्रिल ला सकाळी 11.55वाजता नेर गावात होणार होते.परंतु लोकसभा निवडणुकीचे मतदान असल्याने नवरदेवासह संपूर्ण कुटुंबासह वऱ्हाडणे मतदान करूनच लग्नाला जाण्याचे ठरवले यावेळी कामठी येथील पोरवाल कॉलेज मतदान केंद्रावर नवरदेवासह वऱ्हाडाणे आधी मतदान केले मग लग्न यवतमाळ नेर कडे रवाना झाले.मतदान करूनच अनेकांनी लग्न सोहळ्याला हजेरी लावली.
लग्न मंडपी सर्वसाधारण पद्धतीने वर-वधूला जाताना आपण नेहमीच पाहतो. मात्र, कामठी येथील प्रशांत खोब्रागडे ने लग्न मंडपी जान्यापूर्वी निवडणूक मतदान दिनाचे औचित्य साधून मतदान करत देशाच्या संविधानाला तसेच लोकशाहीला बळकट करण्याचं काम करत सामाजिक संदेश दिला आहे.त्यातच नवरदेवाहसह समस्त कुटुंबीयांनी मतदान करून लग्न कार्यक्रमात सहभागी झाल्याने एक आकर्षण ठरले होते.
नवरदेव प्रशांत खोब्रागडे – लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण.मात्र योगायोगाने आज 19 एप्रिल ला माझ्या लग्नाच्या दिवशी लोकसभां निवडणूक आहे.आज माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा दिवस असला तरी देशाच्या दृष्टीने हा लोकशाही चा भविष्य ठरवणारा दिवस आहे त्यामुळे मी लग्न मंडपात जाण्यापूर्वी माझा मतदानाचा हक्क बजावला..मी सर्वाना हेच आवाहन करते की काहीही झालं तरी मतदान करायला विसरू नका.आपला हक्क आवर्जून बजावा.