संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- सामान्य गोरगरीब मुलांना शिक्षण मिळावे यासाठी शिक्षणाचे सर्वत्रिकरण करण्यात आले स्वातंत्रानंतर गाव खेड्यात शाळा सुरू झाल्या गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळू लागले.पण मागील म्हणजे 2014 पासून शिक्षक भरती झाली नाही या काळात हजारो शिक्षक निवृत्त झाले आज अनेक जी प आणि खाजगी अनुदानित शाळेत शिक्षकच नाही त्यामुळे गोरगरीब मुलाचे मोठे नुकसान होत आहे.
मागील दोन वर्षांपासून सरकार भरती होणार असल्याचे ढोल वाजवत आहे पण अजूनही भरती झाली नाही अलीकडे तर कमालच झाली सेवानिवृत्त शिक्षकांना मानधनावर ठेवण्याचा सरकारने आदेश काढला त्यामुळे डी एड आणि बी एड झालेल्या बेरोजगार तरुणांची निराशा झाली आहे.असे मत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचाल हुकुमचंद आमधरे, यांनी प्रस्तुत प्रतिनिधीकडे व्यक्त केले.