प्रभाग क्र 17 मध्ये मूलभूत सुविधांचा अभाव

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 
-एमआयएम चे मुख्याधिकाऱ्यांना सामूहिक निवेदन सादर, दहा दिवसांत समस्या मार्गी न लागल्यास नगर परिषद समोर तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा

कामठी ता प्र 4 :- कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या प्रभाग क्र 17 येथे विविध धर्मीय नागरिक मागील 20 वर्षापेक्षा जास्त काळापासून वास्तव्यास आहेत मात्र स्थानिक प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे परिसरात मूलभूत सुविधांचा अजूनही अभाव कायम असून रस्ते,नाली समस्या अजूनही जैसे थे आहे .यासंदर्भात आज एमआयएमआयएम चे नागपूर ग्रा जिल्हा अध्यक्ष शकिबुर रहमान , कामठी तालुका अध्यक्ष मजाहिर अनवर यांच्या अध्यक्षतेखाली व वसीम अख्तर व नदीम अख्तर यांच्या मुख्य उपास्थितीत नागरिकासमवेत मुख्याधिकाऱ्यांना दुसऱ्यांदा सामूहिक निवेदन सादर केले.यावर मुख्याधिकाऱ्यानी नागरिकांना समस्या मार्गी लागणार असल्याचे आश्वासित केले असले तरी पुढच्या दहा दिवसांत समस्या मार्गी न लागल्यास एम आय एम आय एम च्या वतीने कामठी नगर परिषद समोर तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा सुद्धा देण्यात आला.
याप्रसंगी शेख जमशिद, अयाज अहमद, मोहम्मद सैफ, सोहैल ताजी,जीशाण खान, शहेदा बानो, गजाला बानो, खतीबा खातून, अफरोज बानो, सबिहा परवीन, रमिजा बानो, अलफोया बानो, सैययदा अख्तर, निलोफर बानो, अजरा बानो, सुनंदा मेश्राम यासह आदी महिला वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 8 जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता  

Tue Jul 5 , 2022
मुंबई : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी वर्तविली आहे. उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि दक्षिण कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नंदुरबार आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाट क्षेत्रात मुसळधार ते अतिमुसळधार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com