धावत्या गाडीत प्रसव वेदना ; गर्भवती गंगागीबाई रुग्णालयात दाखल सुरक्षा बाळाची मदत

अमरदिप बडगे , प्रतिनिधी 

गोंदिया – हैद्राबाद येथून धनबादला जाणाऱ्या गर्भवती महिलेला गाडीतच प्रसववेदना झाल्याने गोंदियातील रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांच्या मदतीने तिला उपचारासाठी गोंदियात उतरवून येथील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रेल्वेच्या सुरक्षा बल जवानांना सुरक्षा नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाली कि गाडी क्रमांक १७००७ सिकंदराबाद एक्स्प्रेस मधिल महिला प्रवासाला प्रसववेदना धावत्या गाडीतच सुरु झाल्या आहेत. माहिती मिळाल्यानंतर पोलीस प्रभारी व्ही. के तिवारी यांच्या नेतृत्वात महिला पोलीस शिपाई ज्योती बाला यांनी गाडीचे एसई -१ कोच गाठले व त्या महिलेला कुशलतेने गाडीतून उचलुन खाली उतरविले. वेळीच काळजी घेत रुग्णवाहिका तत्काळ बोलावून बाई गंगाबाई रुग्णालय दाखल करण्यात आले सरिता दिलीप सोनी २२ वर्ष असे त्या गर्भवती महिलेचे नाव असुन तिच्या सोबत तिचा पती होता.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

तिरोडा लिटिल फ्लावर अकेडमीचे दोन विद्यार्थ्यांची नवोदय करिता निवड

Mon Jul 18 , 2022
अमरदिप बडगे, प्रतिनिधी  गोंदिया – जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय वर्ग 6 वी करिता परिक्षा घेण्यात आली होती.यामध्ये तिरोडा येथील लिटिल फ्लावर अकेडमीचे दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.यामध्ये तन्मय रघुनाथ शहारे,व शमुख उमेश बिसेन अशी विद्यार्थ्यांची नावे असुन त्यांच्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक रोहित कुमार तिरपुडे सह शाळेचे इतर शिक्षक शिक्षिका , सुजाता डहाटे, राधाकृष्ण शेंडे, संजय कनोजे, मंगेश गेडाम, विजया […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com