– मनसे महिला सेनेच्या आंदोलनाला यश,
नागपूर :- कामगारमंत्री सुरेश खाडेंनी रघूजीनगर जलतरण तलावाला 2 कोटींची मंजुरी दिली व मार्च 2023 पर्यंत पुर्ण काम करण्याचे तातडीचे आदेश.
महाराष्ट्र राज्य सरकारने रघुजी नगर नागपूर येथे सन १९९४ मध्ये जलतरण तलाव बांधून दिला असून सध्याच्या स्थितीत पूर्णपणे बंद आहे व मध्यंतरी जलतरण तलाव सुरू करण्या संबंधीत महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या माजी शहराध्यक्ष मनीषाताई पापडकर यांच्या नेतृत्वात टाकीत उतरून तीव्र आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर या विषयाच्या संबंधित अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग येथील अभियंता यांना भेटून जलतरण तलावातील काम सुरू करण्यासंबंधीत यांना पत्र व्यवहार केलेला होता, नुकतेच कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी या जलतरण टाकीची संपूर्ण पाहणी करून संपूर्ण कामगार कल्याण येथील जलतरण तलावाला दोन कोटी मंजूर करून ताबडतोब कामाला सुरुवात करण्यासंबंधीचे पत्र सहाय्यक आयुक्त नंदलाल राठोड यांना देण्यात आले. कोरोणा महामारीच्या काळात जलतरण तलाव बंद होते. शासनाच्या कामातील होत असलेल्या दिरंगाईमुळे अनेक प्रशिक्षक बेरोजगार झालेले आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून नूतनीकरण करण्यात आलेले नव्हते. नूतनीकरण प्रलंबित असल्यामुळे येथील कामगार व कामगार कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली होती शिवाय आजपर्यंत रघुजी नगर जलतरण तलाव नागपूर येथून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरणपटू निर्मित झाले आहेत. प्रलंबित कामामुळे संपूर्ण भावी पिढीचे आणि कार्यरत कामगाराचे खूप नुकसान झालेले आहे व पुढे यांचे नुकसान होऊ नये याकरीता कामगार मंत्री सुरेश खाडे त्वरित नूतनीकरण करण्यासंबंधी आदेश संबंधित विभागाला दिले त्याबद्दल मनीषा पापडकर यांनी अभिनंदन व्यक्त केले.