– जंतापासून मुक्त, होतील मुले सशक्त
नागपूर :- जिल्हयात ४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन राबविण्यात आला असून या दिवशी १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना आरोग्य विभागाच्या वतीने जंतनाशक गोळी दिली जाणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबत नियोजन केले असून शिक्षण विभाग व बाल कल्याण विभाग यांच्या समन्वयाने सुमारे ५१९४०७ मुला-मुलींना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. जंतामुळे बालकांमध्ये व किशोरवयीन मुला-मुलींमध्ये ॲनिमिया, पोटदुखी, उलट्या, अतिसार, मळमळ, भूक मंदावणे आदी आजारांचा धोका उद्भवतो. त्यामुळे हा संभाव्य धोका टाळण्यासाठी १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींनी जंतनाशक गोळी दिली जाणार आहे.
जिल्हयातील आरोग्य विभागाने राष्ट्रीय जंतनाशक दिनाची तयारी केली असून, तालुका आरेाग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व इतर संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हयतील २५०१ अंगणवाडी केंद्रे, २०५९ शाळा व महाविद्यालयांमध्ये सुमारे ५१९४०७ मुला-मुलींना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. काही कारणास्तव ४ डिसेंबरला ज्या बालकांना जंतनाशक गोळी दिली गेली नसेल अशा वंचित सर्व बालकांना १० डिसेंबरला मॉप-अप दिनी ही गोळी देण्यात येणार आहे.
राष्ट्रीय जंतनाशक मोहिम डॉ.विपीन ईटनकर जिल्हाधिकारी नागपूर व विनायक महामुनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखालील राबविण्यात येणार आहे. सदर मोहिम यशस्वी करण्याकारीता महिला व बालकल्याण विभाग,आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी, डॉ.यश बनाईत इंडीयन असोशियशन बालरोग तज्ञ ,जिल्हा शल्य चिकित्सक , शिक्षण अधिकारी माध्यमीक, प्राथमिक, यांचे सहकार्य लाभले.
राष्ट्रीय जंतनाशक दिन कार्यक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ मौजे खापरी येथे करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तावकि डॉ.रेवती साबळे जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी यांनी करुन सदरील कार्यक्रमाची सविस्तर रुपरेशा मांडण्यात आली. कार्यक्रमाचे उदघाटन कुंदा राऊत उपाघ्यक्ष जिल्हा परिषद नागपूर तथा अध्यक्ष आरोग्य समिती जिल्हा परषिद नागपूर यांच्या हस्ते शालेय बालकांना ॲलबेनडाझोल ची गोळी खाऊ घालुन करण्यात आली .कार्यकामा प्रसंगी कुंदा राऊत यांनी उपस्थीत शालेय बालकांशी खुला संवाद साधुन त्यांना आरोग्याचे महत्व तसेच संतुलीत आहार व नियमीत व्यायाम करण्याचे फायदे देखील सांगितले चांगल्या आरोग्य साठी आरोग्य विभाग जिल्हा परिषद नागपूर मार्फत दिल्या जाणा-या आरोग्य सेवेवा वेळोवेळी घेण्याबाबत सांगीतले. तसेच या कार्यक्रमाच्या निमीत्ताने जिल्हयातील १ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींनी ४ डिसेंबरला दिली जाणारी जंतनाशक गोळी घेण्याबाबत आवाहन करण्यात आले
कार्यक्रमास अवंतिका लेकुरवाळे ,सभापती महिला व बाल विकास विभाग, रुपाली मनोहर सभापती पंचायत समिती नागपूर,वृदा नागपूर जिल्हा परिषद सदस्य, यांनी मार्गदर्शन केले अविनाश पारधी उपसभापती पंचायत समिती नागपूर, सिध्देश्वर काळुस शिक्षण अधिकारी प्राथमिक, राजनंदीनी भागवत गट विकास अधिकारी नागपूर,डॉ.चंद्रकांत विरुणकर तालुका आरोग्य अधिकारी नागपूर,डॉ.वैशाली गजभिये वैदयकिय अधिकारी,डॉ.रॉली वेसनकर समुदाय आरोग्य अधिकारी, अर्चना नागपूर केंद्र प्रमुख जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, विलास भोत्मांगे मुख्याध्याप जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, तसेच गावातील नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमास रेखा खापरे संरपंच खापरी तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे सहाकार्य लाभले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खापरी येथील शिक्षण व आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.रॅली वेसनकर सामुदाय आरोग्य अधिकारी यांनी कले आभर प्रदर्शन डॉ.प्रशांत कापसे वैदयकिय अधिकारी यांनी केले.