कुणाल, सरोज लाल माती कुस्तीत अव्वल – खासदार क्रीडा महोत्सव लाल माती कुस्ती स्पर्धा

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील लाल मातीतील कुस्ती स्पर्धेमध्ये रामटेक येथील कुणाल माहुर्ले आणि मौदा येथील सरोज देशमुख यांनी आपापल्या गटात बाजी मारुन जेतेपदाचा खिताब पटकाविला.

महाल येथील चिटणीस पार्कमध्ये झालेल्या लाल मातीतील कुस्ती स्पर्धेत एकूण १३३ मल्लांनी सहभाग नोंदविला. ४५ किलो वजनगटातील अंतिम लढत कुणाल मोहुर्ले आणि प्रिंस दमाहे या रामटेकच्या कुस्तीपटूंमध्ये झाली. यामध्ये कुणालने प्रिंसला मात देत विजेतेपदाचा मान मिळविला. ४८ किलो वजनगटात मौदा येथील सरोज देशमुखकडून नागपूरच्या पीयूष बक्सरेला पराभव स्वीकारावा लागला.

अन्य वजनगटामध्ये देवकुमार बक्सरे, अर्जुन चव्हाण, अरुण ढेंबरे, अजय रहाटे, रुपेश कनोजे यांनी विजय मिळविला.

राजे मुधोजी भोसले यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले होते. विजेत्यांना नागपूर जिल्हा मल्लविद्या ऑर्गनायजेशनचे अध्यक्ष डॉ. जयप्रकाश दुबळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी हेमंत डोणगावकर, चंद्रशेखर जाधव, बंडू राउत, संजय बालपांडे, अरुण बुटे, श्याम फाळके, अनील आदमने आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

ORDER DETAINING DHIRAJ PRAKASH BERIYEKAR UNDER MPDA ACT QUASHED AND SET ASIDE BY DIVISION BENCH

Sat Feb 1 , 2025
Nagpur :- Division Bench presided over Nitin W. Sambre and Vrushali V. Joshi JJ have quashed and set aside order of detention dated 12-04-2024 passed by Collector/District Magistrate, Gondia thereby detaining him under sec 3 of Maharashtra Prevention of Dangerous Activities of Slumlords, Bootleggers, Drug offenders, Dangerous persons and Video Pirates Act, 1981. Adv Mir Nagman Ali appearing for Dhiraj […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!