नागपूर :- संघटनात्मक निवडणुकीत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष पदी निवडून आल्यानंतर आज कुणाल राऊत यांनी शहरात पक्षाच्या वरिष्ठ काँग्रेस नेत्यांशी भेट घेवून आशीर्वाद घेतले.

कुणाल राऊत यांनी माजी खासदार विजय दर्डा, विलास मुत्तेमवार, नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, वरिष्ठ काँग्रेस नेता गिरीष पांडव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव शकुर नागानी यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून चर्चा केली.

महाराष्ट्रात युवकांची भक्कम फळी बांधून जिल्हा, तालुका पातळीवर युवकांची शिबिरे घेणार असल्याचे सांगीतले व पक्ष संघटना वाढीसाठी चर्चा केली.

प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव अजित सिंग, आसिफ शेख, इरशाद शेख, निलेश खोरगडे, सतीश पाली, निलेश खोब्रागडे, सचिन वासनिक, आकाश इंदुरकर, राहुल टेकाळे आदि उपस्थित होते.

Tue Mar 22 , 2022
संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 22:-बिडी कामगारांचे नेते कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे हे आंबेडकरी चळवळीतील एक समर्पित नेते होते.अशे उत्तुंग व्यक्तिमत्वाचे धनी असलेले ऍड दादासाहेब कुंभारे यांचा कामठी शहरात जन्म झाला असून उद्या 23 मार्च ला त्यांचा 99 वा जन्मदिवस आहे.त्यांच्या या जन्मदिनानिमित्त संघर्षमय जीवणातुन त्यांच्या एक जीवन संघर्षावर भन्ते नागदिपणकर यांनी केलेल्या अविस्मरणोय आठवणीतून जीवनकार्यावर घातलेला एक […]