नागपूर – क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या शहीद दिनानिमित्त विविध पक्ष व संघटनांच्यावतीने अभिवादन करण्यात आले. तसेच सुभाष नगर येथील आदिवासी संघटने चे अध्यक्ष दुर्गेश मसराम व त्यांचा पदाधिकारी यांनी फुटला चौकातील भगवान बिरसमुंडा यांचा पुतळ्याला माल्याआर्पण केले व त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे सचिव केतन ठाकरे हे प्रामुख्याने उपस्थित होते .
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीकारक आणि आदिवासींच्या हक्कांसाठी लढणारे बिरसा मुंडा यांची 9 जून 22 ला 122वी पुण्यतिथी होती. केवळ 24 व्या वर्षी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या बिरसा मुंडांनी एक वेगळीच छाप उमटवली आहे.
1857 चा उठाव दडपल्यानंतरही भारतातील वेगवेगळ्या प्रदेशात ब्रिटिशांविरोधात उठाव सुरु झाले होते. त्यामध्ये 1895 ते 1900 सालाच्या दरम्यान मध्य भारतातील, छोटा नागपुरच्या प्रदेशात बिरसा मुंडा यांनी सुरु केलेली ‘उलगुलान’ चळवळ ही महत्वाची आहे. देशावर राज्य करणारे इंग्रज आणि आदिवासींचे धर्मांतर करणारे मिशनरी या दोघांच्या विरोधात लढा देण्यात बिरसा मुंडा यांनी आपले जीवन व्यतीत केलं.